Nanded Crime | धक्कादायक ! शेतकर्‍यानं बँकेच्या समोरच संपवलं आयुष्य; जाणून घ्या प्रकरण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात यंदा मराठवाडा आणि कोकणाला पावसाने झोडपून (Rain in Maharashtra) काढले. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक गावं पाण्याखाली गेली. मुसळधार पावसाचा (Heavy rain) सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना (farmer) बसला आहे. हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं. एकीकडे पावसामुळे पिकं गेली आणि दुसरीकडे बँकेच्या वसुलीमुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. नांदेडमध्ये (Nanded Crime) एका शेतकऱ्याने बँकेसमोर विष पिऊन (drink poison) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात (Nanded Crime) खळबळ उडाली आहे.

 

नांदेडमध्ये (Nanded Crime) अतिवृष्टी आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याला बँकेने कर्ज वसुलीबाबत नोटीस (Debt recovery notice) पाठवली. नोटीस बजावल्यानंतर, आर्थिक संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्याने बँकेसमोरच विष प्राशन करुन आपल्या आयुष्याचा शेवट केला. बँकेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पुढील तपास सुरु केला आहे.

 

 

केशव रामदास पवार Keshav Ramdas Pawar (वय-55 रा. नयेगाव ता. माहूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. केशव पवार यांच्यावर बुलडाणा अर्बन बँकेचे (Buldana Urban Bank) दोन लाखांचे कर्ज होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेने कर्जफेडीबाबतची नोटीस पाठवली होती. शनिवारी (दि.13) सकाळी अकराच्या सुमारास पवार हे कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी बँकेत गेले होते. परंतु बँकेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी बँकेच्या आवारातच विष प्राशन करुन आत्महत्या केली.

 

केशव पवार यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता.
त्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.
अस्मानी संकटामुळे हाताशी आलेलं पिक गेलं.
त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा समाना करीत होते.
तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेतून ते नैराश्येत होते.
अशातच त्यांना बँकेने कर्जफेडीची नोटीस पाठवली. यामुळे पवार यांनी विष प्राशन करुन बँकेच्या आवारातच आपल्या आयुष्याचा शेवट केला.
या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Nanded Crime | farmer commits suicide in front of bank in nanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा