Nanded Crime | सैराटची पुनरावृत्ती! नांदेडमध्ये प्रेमसंबंधामुळे कुटुंबीयांनीच केली पोटच्या लेकीची हत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Nanded Crime | नांदेडमध्ये पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली आहे. आपल्या प्रतिष्ठेपायी त्यांनी हि हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर जाळून त्याची राख जवळच्याच ओढ्यात फेकून दिली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (Nanded Crime)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल या ठिकाणी एका कुटुंबाने आपल्याच मुलीची हत्या केली आहे. शुभांगी जोगदंड असे मृत मुलीचे नाव असून ती 23 वर्षांची होती. शुभांगी बीएएमसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभांगीने हे लग्न मोडायला भाग पाडले त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांची गावात मोठी बदनामी झाली. (Nanded Crime)

गावात बदनामी झाल्यामुळे शुभांगीचे कुटुंबीय नाराज झाले. त्यामुळे रागाच्या भरात कुटुंबीयांनी तिची हत्या केली.
रविवारी रात्री म्हणजेच 22 जानेवारी रोजी कुटुंबीयांनी शुभांगीची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतात जाळला.
यानंतर मृतदेहाची राख ओढ्यात टाकून दिली. शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती.
यानंतर मित्र- मैत्रणीनीं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यादरम्यान एका गुप्त बातमीदाराने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु करून या प्रकरणाचा छडा लावला. शुभांगीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली आहे.

Web Title :- Nanded Crime | father and brothers takes life of girl due to love affair in nanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR