Nanded Crime | नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थीनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह 3 विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded Crime | जिल्ह्यातील हदगावमधील गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहात तीन सिनियर विद्यार्थिनींनी नव्याने प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीचे रॅगिंग केल्याचे उघडकीस आले. तिला विवस्त्र होऊन झाडू मारण्यास सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे वसतिगृह अधिक्षकांकडे पीडितेने तक्रार केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्या मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर वसतिगृह अधीक्षकांसह तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा (Nanded Crime) नोंदवण्यात आला आहे.

पीडित मुलीने पऊळ नर्सिंग महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतला होता. वसतिगृहातील सिनियर तीन मुलींनी तिला कपडे काढ, नाक घास, झाडू मार असे म्हणत कपडे काढण्यास भाग पाडल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. याशिवाय तू हलक्या जातीची आहेस, तुझे शैक्षणिक नुकसान करतो, अशी धमकी भगीरथ शिंदे या शिक्षकाने दिल्याचा आरोपही मुलीने केला आहे. दरम्यान, शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ वसतिगृह व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे वातावरण चिघळले असून पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केल्यानंतरच यावर भाष्य करणार असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ

Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून बेदम मारहाण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nanded Crime | nanded hadgaon govindrao poul nursing school college hostel ragging on girl student

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update