नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Nanded Crime News | अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. हे प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे. हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी उपसरपंच असलेल्या बाबुराव तुपेकर (वय-५५) याला अटक केली आहे. (Minor Girl Rape Case)
गावातील १६ वर्षीय मुलीवर आरोपी बाबुराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी पाण्यात दारू आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले होते. यानंतरही तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे. त्यावरून तामसा पोलिसांनी उपसरपंचाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अवैध संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकिय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीने नवजात अर्भक विकल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.