Nanded Crime News | अंगावर उकळतं पाणी पडून ऊसतोड कामगाराच्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू; नांदेडमधील घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Nanded Crime News | नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एका ऊसतोड कामगाराच्या 5 वर्षीय मुलाचा अंगावर उकळतं पाणी पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लोहा तालुक्यातील शिरढोण शिवारामध्ये घडली आहे. या घटनेमुळे त्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Nanded Crime News)
काय घडले नेमके?
मृत ५ वर्षीय चिमुकल्याचे नाव कार्तिक पांडुरंग शिंदे (वय 5, रा.डोलारा) असे आहे. दगडाच्या चुलीवर आंघोळीसाठी ठेवलेले पाणी उकळत असताना सकाळी बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कार्तिक चुलीजवळ बसून उब घेत होता. यादरम्यान चुकून त्याचा धक्का चुलीच्या दगडाला लागला आणि चुलीवर असलेले उकळते गरम पाणी कार्तिक याच्या अंगावर पडले. गरम पाणी अंगावर पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर मुलाच्या कुटुंबीयानी आणि फडावरील कामगारांनी जखमी कार्तिकला उपचारासाठी तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ऊसतोड कामगार पांडुरंग सत्ताजी शिंदे हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील ऊसतोड करणाऱ्या
टोळीसोबत पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन ऊसतोडीसाठी ऊस फडातील कामावर होते.
यादरम्यान मुलाच्या अंगावर उकळते पाणी पडून त्याचा मृत्यू झाल्याने पांडुरंग शिंदे यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Nanded Crime News | 5 year old boy died after hot water fell on his body in shirdhon village nanded crime news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…
Pune Crime News | चोर्या करणार्या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी