Nanded Crime News | पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा, वरिष्ठांची बंदूक हाताळताना सुटली गोळी अन्…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded Crime News | वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंदूक (Police Gun) हाताळणं एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच अंगलट आले आहे. बंदूक हाताळण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्याच्या हातून बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेला आणि बंदूकीतून सुटलेली गोळी जमिनीला लागली. ही घटना बुधवारी (दि.5) सकाळी नांदेड कारागृह (Nanded Jail) परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत (Nanded Crime News) कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबाराच्या (Firing) घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली.

कारागृहात असलेल्या कैद्यांना (Prisoners) न्यायालयात हजर करण्याचे काम मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असता. आरोपींना न्यायालयात (Court) नेण्यापासून त्यांना पुन्हा कारागृहात आणण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची असते. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक के.एच. आरेवार (PSI K.H. Areyvar) हे आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी कारगृहात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा राईटर गिते आणि पोलीस कर्मचारी जरांडे होते. (Nanded Crime News)

कारागृहात जात असताना बंदूक नेण्याची परवानगी नसल्याने आरेवार यांनी त्यांची बंदूक राईटर गीते यांच्याकडे दिली.
त्यानंतर जरांडे यांनी ही बंदूक घेऊन हाताळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान बंदूकीचा ट्रिगर दाबला गेला आणि
बंदूकीतून गोळी सुटली. ती गोळी जमिनीला लागली. सुदैवाने ही गोळी जमिनीला लागल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक आरेवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी जबाब दिला.
पोलीस कर्मचारी जरांडे यांच्या हातून चुकीने हा गोळीबार झाल्याचे आरेवार यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद
केले आहे. दरम्यान या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Web Title :-Nanded Crime News | in nanded a policeman suddenly pulled the trigger of a gun and fired a bullet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस