Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  Nanded Crime | निराधार योजनेत मिळालेलं मानधान देत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात बाजेचा ठावा घालून निर्घृण हत्या (Murder) केली. तर आपल्या वयोवृद्ध आईलाही मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. नांदेड (Nanded Crime) जिल्ह्यातील हदगाव (Hadgaon) याठिकाणी हि घटना घडली असून माधव दशरथ घंगाळे (वय ७०) असं हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा संजय माधव घंगाळे याला अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हदगाव तालुक्यातील तुळणी येथे माधव घंगाळे राहतात.
ते अपंग असल्याने गावातच पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात. माधव यांना अर्धांगवायू झाल्याने ते घरीच राहतात.
त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला निराधार योजनेचे मानधन मिळालं होतं. तर त्यांचा मुलगा संजय हा दारूच्या आहारी गेला होता.
दारूसाठी पैसे देत नसल्याने तो नेहमी आपल्या आई वडिलांना मारहाण करत असे.
निराधार योजेतून उदरनिर्वाह करताना आधीच कसरत करावी लागत होती.
त्यातून मुलाला जर पैसे दिले तर जगायचे कसे असा प्रश्न घंगाळे दाम्पत्यापुढे होता.
निराधार योजनेत मिळालेलं मानधान मला का देत नाही’, यावरून आपल्या आई वडिलांशी संजयने एके दिवशी वाद घातला.
हा वाद इतका टोकाला गेला की संजय याने बाजेचा ठावा वडिलांच्या डोक्यात घातला.
हा घाव इतका जबरी होता की, वडील जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

संजयने चिडून जाऊन आईलाही मारहाण केली. तीही गंभीर जखमी झाली. आसपासच्या लोकांना हि घटना समजताच दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मात्र माधव घंगाळे यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. तर नांदेड (Nanded Crime) येथील शासकीय रुग्णालयात आईवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी संजयला अटक केली आहे.

 

Web Title : Nanded Crime | son killed father for not giving money for alcohol in nanded beat mother also

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Municipal Election | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग?

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा दाखल