Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना

भोकर/नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – Nanded Crime | आदिलाबाद ते मुंबई धावणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Nanded Crime) नांदेड जिल्ह्यातील भोकर रेल्वे स्थानकाजवळ (Bhokar Railway Station) शुक्रवारी (दि.11) दुपारी 3.45 च्या सुमारास घडली. शिवराज मनोज क्यातमवार Shivraj Manoj Kyatamwar (वय 24 रा.कासारगल्ली भोकर) व धारा माधव मोरे Dhara Madhav More (वय 18 रा. रिठ्ठा ता. भोकर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे (Lovers) नाव आहे.

 

आदिलाबाद (Adilabad) ते मुंबई (Mumbai) धावणारी नंदिग्राम एक्सप्रेस (Nandigram Express) भोकर स्थानकाकडे रवाना झाली होती. दुपारी पावणे चारच्या सुमारास स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या भोकर ते नांदेड रेल्वे उड्डाणपूलाखाली (Railway Flyover) शिवराज आणि धारा या दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 

या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाने मुदखेड रेल्वे पोलिसांना (Mudkhed Railway Police) माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस स्टेशनचे (Railway Police Station) पोलीस निरीक्षक सुरेश उनवने (Police Inspector Suresh Vunwane)
यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पोपपलवार , दत्ता मुगल, पोलीस नाईक अनंता आगाव व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

 

दरम्यान दोघांचे मृतदेहाचे तुकडे झालेले होते. मृतदेह शासकिय रुग्णालय भोकर येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :- Nanded Crime | the lovers ended their lives by jumping in front of the train near bhokar station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ होतो आहे वायरल; म्हणाली ‘मला त्या ठिकाणी जायला…’

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार