दुर्दैवी ! न्यायाधीशांचा अंगरक्षक अपघातात ठार, पोलिस दलात हळहळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्य बजावून रात्री घराकडे दुचाकीवरून परतत असताना जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांच्या अंगरक्षकाचा अपघातात मृत्यू झाला. नांदेड ते सिडको रस्त्यावर मातोश्री मंगलकार्यलयासमोर मंगळवारी (दि. 19) २९) रात्री साडेआठच्या सुमारास घडली ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत होती.

पोलिस शिपाई विद्याधन एकनाथ ढेंबरे (वय 35 ) असे अपघातात ठार झालेल्या अंगरक्षकाचे नाव आहे. ते पोलिस मुख्यालयातील व सध्या जिल्हा न्यायालयातील जिल्हा तदर्थ न्यायाधीश (दुसरे) यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. ढेंबरे आपले कर्तव्य बजावून रात्री दुचाकीवरुन सिडकोकडे जात होते. त्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास नांदेड ते सिडको रस्त्यावर असलेल्या मातोश्री मंगलकार्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुध्दो पडले. लगेच काही नागरिकांनी त्यांना विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रानी जाहीर केले.

ढेंबरे 2010 मध्ये पोलिस दलात रूजू झाला होता. त्याने यापूर्वी कंधार पोलिस ठाण्यात सेवा केली होती. मागील दीड वर्षांपूर्वी त्यांची बदली पोलिस मुख्यालयात झाली. तेंव्हापासून ते जिल्हा न्यायाधीश (दुसरे) यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व अशी विद्याधन ढेंबरे यांची ख्याती होती. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून नेमका अपघात कसा झाला याचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.