नांदेड : मराठा आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

नांदेड : पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून, मागील चार दिवसापासून राज्यात आंदोलनाची अद्यापही धग कायम आहे. नांदेड तालुक्यातील आमदुरा येथे गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आमदुरा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20384ec0-918c-11e8-921b-15996745d572′]

मात्र आंदोलनादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडली. आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन केले जाण्याच्या शक्यता असल्यामुळे उमरी, धर्माबाद व नायगाव या तालुक्यात ही नदी काठावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.