नांदेड येथे लवकरच पत्रकार भवन उभारणार अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री होताच दिला शब्द

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – नांदेड जिल्हाभरात ठीक ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सत्कार झाले.त्यापैकी नांदेड शहर मध्ये अशोक चव्हाण यांनी सुद्धा अनेक पत्रकाराचे स्वागत केले. नांदेड येथे पत्रकार भवन व्हावे ही जिल्ह्यातील पत्रकारांची जुनी मागणी असून पत्रकार भवनाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावून लवकरच नांदेड येथे पत्रकार भवन उभारणार अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे बोलताना दिली.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पण दिनाच्या पुर्वसंध्येला शासकीय विश्रामगृहाच्या मिनी सह्याद्री सभागृहात आज त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. दर्पण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, नांदेड येथे पत्रकार भवन व्हावे ही जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची जुनी मागणी आहे. नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या अजेंठा मध्ये पत्रकार भवनाचा समावेश आहे,त्यामुळे लवकरच नांदेड येथे पत्रकार भवन उभारण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी विकास कामात नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. आगामी काळात देखील विकास कामांसाठी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मराठी पञकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, ज्येष्ठ पञकार रामप्रसाद खंडेलवाल, जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, महानगर सरचिटणीस अभय कुळकजाईकर, गजानन चौधरी,  अ‍ॅड. मो.शाहेद, निळकंठ मदने, कंथक सुर्यतळ,  हैदरअली, साईनाथ पांढरे, मारोती स्वामी, प्रमोद गजभारे, ज्ञानेश्वर सुनेगांवकर, जोशी यांच्या सह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

दर्पण दिनाच्या निमित्ताने सत्कार सोहळा भोकर येथे पार पडला.

पत्रकार बांधवांचा सत्कार नगरपरिषद कार्यालय भोकर, तहसील कार्यालय भोकर, पोलीस स्टेशन भोकर मध्ये सुद्धा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर राजकीय पक्षातील कार्यकर्ते सुद्धा दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवाचा सत्कार केला आहे यावेळी अनेक पत्रकार उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/