नांदेड : 15 तास उलटुनही एकाही डॉक्टरने तपासले नाही, खा. चिखलीकर यांची अचानक भेट

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओपीडी वॉर्ड मध्ये ओपन जागेत बेड टाकून कोरोना पॉजिटिव्ह आणि संशयित रुग्नांवर उपचार सुरु आहेत. कोविड पॉजिटिव्ह रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक आहेत. पंखे नसल्याने नातेवाईक रुग्नांना रुमालाने हवा मारत असल्याचे विदारक चित्र आहे. मोकळ्या जागेत पडदे लावून आडोसा करुण ऑक्सीजन लावले जात आहे.

काल आलेल्या एका रुग्णाला 15 तास उलटुनही एकाही डॉक्टरने तपासले नसल्याचे नातेवाईकाने सांगितले. कोरोनाचे 170 बेड फूल आहेत तर 215 रुग्ण आहेत. 45 रुग्ण बेड साठी वाट बघताहेत. हॉस्पिटल मध्ये घानीचे साम्राज्य आहे. हॉस्पिटल पेक्षा गावातील उकंडा बरा अशी प्रतिक्रिया परिस्थीती पाहुन खा. चिखलीकर यांनी व्यक्त केली. या गंभीर परिस्थीतीची तक्रार चिखलीकर यांनी फोनवरुन जिल्हाधिका-यांकडे केली. वेटिंग मध्ये असलेल्या रुग्णाना 200 खाटाच्या नव्या रुग्णालयात हलवन्यात यावे अशी सूचनाही खा. चिखलीकर यांनी केली.