Nanded Police | नांदेडच्या महिला पोलिसाला व्हायचंय पुरुष, हायकोर्टाने दिली ‘ही’ सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड पोलीस दलात (Nanded Police) कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) शस्त्रक्रिया करुन पुरुष व्हायचं आहे. यासाठी या महिला पोलीस (Nanded Police) कॉन्स्टेबलने लिंग बदलासाठी (Gender Change) मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाकडून त्यांना कुठलाही दिसाला मिळाला नाही. आधी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे (Maharashtra Administrative Tribunal (MAT) ‘मॅड’कडे दाद मागावी, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिली आहे.

 

नांदडची महिला पोलीस कॉन्स्टेबल (Nanded Police) वर्षा उर्फ विजय पवार Varsha alias Vijay Pawar (वय-36) यांनी हायकोर्टात लिंग बदलासीठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया (Surgery) करुन पुरुष व्हायचं आहे. यासाठी एक महिन्याची रजा मिळावी. तसेच या शस्त्रक्रियेचा खर्चही राज्य सरकारने (State Government) करावा, अशी मागणी या महिला पलीस कर्मचाऱ्याने केली आहे. पवार यांच्या याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.

वडिलांच्या निधनानंतर पवार यांनी एप्रिल 2005 मध्ये अनुकंपा तत्वावर पोलिसात भरती झाल्या. मे 2012 मध्ये त्या नाईक झाल्या. बहिणीसारखी एक स्त्री म्हणून दिसत असलो तरी मनात कायमच पुरुषी भावना येत होत्या, असं त्यांनी याचिकेत नमूद केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये केलेल्या चाचणीत आपण पुरुष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सेंट जॉर्ज हस्पिटलनेही (St. George’s Hospital) चाचणीचे रिपोर्ट बरोबर असल्याचे म्हटले आहे. तसेच शस्त्रक्रिया करुन लिंग बदल करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. एप्रिल 2021 मध्ये दिल्लीमधील हॉस्पिटलनेही त्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे.

 

समस्या सोडवण्यासाठी पवार यांनी आपली व्यथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडील. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्या मागणीची आणि विनंतीची दखल घेतली नाही. त्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये नांदेड पोलीस अधीक्षकांना (Nanded SP) पत्र लिहून विनंती केली. यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पोलीस महासंचालक (DGP) यांना पत्र लिहून लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याची नियमात तरतूद नसल्याने मार्गदर्शन करावे असे पत्रात म्हटले. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी त्यांना नकार दिला.

 

पोलीस अधिकाऱ्यांकडून काहीच मदत होत नसल्याने अखेर पवार यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.
अॅड. एजाज नक्वी (Adv. Eijaz Naqvi) यांच्या मार्फत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
शारीरिक बदल हा नैसर्गिक आहे आणि मानसिकदृष्ट्या त्या पुरुषी आहेत.
त्यामुळे इच्छेनुसार जीवन जगण्याचा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
तसेच आपलं लिंग बदल शस्त्रक्रिया करुन आपलं नाव बदलून विजय पवार
असं नाव करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली.

पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी हायकोर्टात सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारच्या वकील ज्योती चव्हाण (Adv. Jyoti Chavan)
यांनी याचिकेवर आक्षेप घेताना न्यायालयात सांगितले की,
पवार यांच्याकडे ‘मॅट’ कडे दाद मागण्याचा पर्याय आहे, असं चव्हाण यांनी सांगितले.
यानंतर हायकोर्टाने याचिका निकाली काढत पवार यांना ‘मॅड’ कडे जाण्यास स्वतंत्र असल्याचे स्पष्ट केलं.

 

 

Web Title :- Nanded Police | a nanded police constable who moved bombay hc so
that she could undergo a sex change surgery got no relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा