प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा : विजय भटकर

पुणे : वृत्तसंस्था
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी “नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा कराप्रवीण भटकर हा शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचा म्हटलं जात होतं. परंतु प्रवीण भटकरशी काहीही संबंध नसून त्याने माझ्या नावाचा उपयोग केला,”अशी मागणी त्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली. पोलिस भरती घोटाळ्याशी आणि प्रवीण भटकरशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर असल्याचा आरोप आहे. प्रवीणने ओएमआर नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत तो डाटा जमा करायचा आणि त्याचा वापर भरतीमध्ये घोटाळा करण्यासाठी करायच. भटकरच्या फसवणुकीचे हे जाळे संपूर्ण राज्यभरात पसरले आहे.

संबंधित घडामोडी:
पोलीस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रविण भटकर पुण्यातील संस्थेत कामाला