मध्यवर्ती बँक (नायगाव) व तहसीलदार यांचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या ‘जिव्हारी’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टी झाल्यामुळे 2019 मध्ये राज्यपालांनी घोषित केलेल्या अनुदानाच्या यादीमधून नांदेड जिल्ह्यातील शेळगाव छत्री हे गाव अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहे. याबाबत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. नायगाव मध्यवर्ती बँक आणि तहसीलदार यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँक तहसीलदार यांच्या भोंगळ कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यपालांनी घोषित केलेल्या अनुदानाची यादी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा नायगाव यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी तहसीलदार यांना विचारणा करण्यास सांगितले. तहसीलदार यांच्याकडे विचारणा केली तर तहसीलदारांनी शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगत जर शासनाकडे निधी उपलब्ध नसेल तर इतर गावांची रक्कम शासन कोणत्या आधारावर देणार असे सांगत हात झटकले.

सध्या राज्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यात बँकेचा व तहसीदार यांचा नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर आला आहे. रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नांदेडचे पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, नायगाव तहसीलदार यांना अर्ज करण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे नायगावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश विठ्ठलराव अनेराये यांनी हा अर्ज ईमेल, व्हाट्सअ‍ॅपद्वारे संबंधितांना पाठवला आहे.