SRPF भरतीसाठी उमेदवारांकडून उकळले अडीच कोटी रुपये

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन
पोलीस भरती घोटाळ्यात पोलिसांना तपास करताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीआरपीएफच्या भरतीमध्ये पुण्यात वानवडी येथे झालेल्या परीक्षेत तीस उमेदवारांच्या उत्तरपत्रिका सोडवल्याचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केतयाचे यात समजते. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रवीण भटकरच्या एसएसजीच्या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम होते. या गोष्टीचा गैरफायदा घेत त्याने उमेदवारांकडून पैसे उकळले. हा घोटाळा पोलीस तपासात समोर आला.

या घोटाळ्याची चौकशी अजूनही पोलीस करत असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नुकतीच एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक हे आहेत. तर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षकांऐवजी आता पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी करत आहेत.

संबंधित घडामोडी:
प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा:विजय भटकर
पोलीस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रविण भटकर पुण्यातील संस्थेत कामाला