Nanded Terrible Accident | दुर्देवी ! नांदेडमध्ये नववधूला घेऊन जाताना भीषण अपघात, नवरीसह 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नांदेड / भोकर : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded Terrible Accident | तीन दिवसांपूर्वी विवाह झालेली (Newly Married) नववधू माहेरी परतणीचा कार्यक्रम करुन सासरी जात असताना झालेल्या भीषण अपघातात (Nanded Terrible Accident) नवरीसह सात जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. हा भीषण अपघात भोकर- किनवट रस्त्यावरील (Bhokar to Kinwat Road) सोमठाणा पाटीजवळ सोमवारी (दि.21) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Nanded News)

पुजा पामलवाड Puja Pamalwad (रा. साखरा) असे मृत्यू झालेल्या नववधूचे नाव आहे. तर नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड Nagesh Sahebrao Kannewad (रा. जारीकोट ता. धर्माबाद), सुनीता अविनाश टोकलवार Sunita Avinash Tokalwar (वय 40 रा.उमरी जहागीर), गौरी माधव चोपलवाड Gauri Madhav Chopalwad (वय दीड वर्ष), अविनाश टोकलवार, अभिनंदन मधुकर कसबे (वय 12) हे जखमी झाले आहेत. (Nanded Terrible Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजीक (Tata Magic) आणि ट्रक यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये नववधूचा देखील समावेश असून नवरदेव जखमी झाला आहे. जखमी नागेश कन्नेवाड याचा 19 फेब्रुवारी रोजी पूजा पामलवाड हिच्यासोबत विवाह झाला होता.

त्यानंतर आज (सोमवार) मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकर मार्गे मॅजिक
वाहनाने जात असताना सायंकाळी सहाच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक मॅजीक
वाहनाला बसली. हा अपघात एवढा भिषण होता की,
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते. अपघातानंतर
दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आले.

Web Title :- Nanded Terrible Accident | nanded seven people were killed on the spot in a tata magic and tempo accident in bhokar kinwat road in nanded district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mohit Kamboj | ‘संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युतीत विष कालवलं’

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान