सोमवार पासून नांदेड ते दिल्ली विमानसेवा सुरू

नांदेड : पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)-नांदेडला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची सेवा व्हावी व कंपनीला महसुल मिळावा म्हणून एअर इंडियाने येत्या सोमवारपासून नांदेड- दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारी (ता. 19) पहिले विमान दिल्लीहुन नांदेडकडे झेपावणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले. नांदेड शहराला विमानसेवेने जेाडण्यात आल्याने जगाच्या कोणत्याही भागात पोहचता येते. नांदेडला लागून असलेल्या परभणी, हिंगोली, यवतमाळ, निझामाबाद या जिल्ह्यातील प्रवाशांनाही जवळ पडणार आहे. सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन गजेंद्र गुट्टे आणि श्रीकांत पद्मे यांनी केले आहे.

एअर इंडियाचे (ए 319) हे विमान १२२ सीटचे आहे. त्यात 114 सीट इकॉनिमीक आणि आठ सिट बिझनेस क्लासच्या आहेत. नांदेड- दिल्ली हा प्रवास एक तास 45 मिनिटाचा असेल. 4256 रुपयापासून भाडे सुरू. आतापर्यंत दिल्ली जाणाऱ्या 100 प्रवाशांची बुकींग. सोमवार व गुरूवारी ही सेवा. सोमवारी (ता. 19) दुपारी 3.20 वाजता दिल्ली येथून उड्डाण तर नांदेडला 5.05 वाजता पोहचेल, परत दिल्लीकडे जाण्यासाठी 5.45 वाजता निघून 7.30 वाजत दिल्ली पोहचेल.