Nanded Traffic Police | मुसळधार पावसात बजावलं कर्तव्य, वाहतूक पोलिसाला मिळालं वरिष्ठांकडून ‘सरप्राईज’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलामध्ये काम करताना कष्ट करणाऱ्यांची कदर केली जात नाही, असा गैरसमज आहे. मात्र, हा गैरसमज नांदेड पोलिसांनी खोटा ठरवला आहे. मुसळधार पावसातही (Heavy Rains) वाहतूक नियंत्रणाचं (Traffic Control) काम करणाऱ्या नांदेड पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला (Nanded Traffic Police) वरिष्ठांनी एक सरप्राईज दिले. वरिष्ठांकडून एका वाहतूक पोलिसाला (Nanded Traffic Police) मिळालेल्या सरप्राईजची सध्या चर्चा आहे. नांदेड वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या अशोक वाडेवाले (Ashok Wadewale) यांना त्यांनी केलेल्या इमानेइतबारे कामाचे अनोख बक्षीस मिळालं आहे.

मुसळधार पावसात निभावलं आपलं कर्तव्य

नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरु असताना पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी (Deputy Inspector General of Police Nisar Tamboli) बाईकवरुन एका ठिकाणी चालले होते. शहरातील अत्यंत वर्दळीच्या साठे चौकात ते जेव्हा आले. त्यावेळी त्यांना एक अनोखे दृश्य पहायला मिळाले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही वाहतूक शाखेचे कर्मचारी वाडेवाले हे चौकात उभं राहून आपलं कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांच्या मदतीला इतर कोणताही पोलीस नव्हता. मात्र, ते एकटेच पावसात उभं राहून वाहतूक नियंत्रण करत होते.

पोलीस उप महानिरीक्षकांकडून दखल

साधारणपणे पाऊस सुरु झाल्यानंतर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आसरा पाहून उभे राहतात. पाऊस कमी झाल्यानंतर ते पुन्हा आपले काम सुरु करतात. परंतु वाडेवाले यांनी मुसळधार पावसातही आपलं कर्तव्य सुरु ठेवलं. त्यांच्या या कामाचे कौतुक निसार तांबोळी यांना वाटलं. त्यांनी वाडेवाले यांना तातडीने 10 हजार रुपयांचं इनाम देण्यात यावं, अशी शिफारस केली आणि ती तात्काळ मंजूरही झाली.

वरिष्ठांकडून वाडेवाले यांना निमंत्रण

वरिष्ठांनी बोलावलं असल्याचा निरोप वाडेवाले यांना देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कर्तव्य निभावत असताना आपल्याकडून काही चूक तर झाली नाही ना, असा विचार ते करु लागले. मात्र जेव्हा आपल्याला कर्तव्य निभावण्यासाठी दहा हजार रुपयांचं इनाम मिळाल्याचे त्यांना समजले, तेव्हा त्यांना कमालीचा आनंद झाला.

आपण केवळ आपलं कर्तव्य बजावत होतो. नांदेडमधील साठे चौक हा वर्दळीचा चौक असतो. तिथली वाहतूक कंट्रोल होत नाही. परंतु आपण आपल्या परीने ते काम करत होतो, अशी प्रतिक्रिया अशोक वाडेवाले यांनी माध्यमांना दिली.

हे देखील वाचा 

Stock Market | ‘या’ IT स्टॉकमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकदार झाले मालामाल! वर्षभरात 5 लाख झाले 13.90 लाख रुपये; जाणून घ्या

Overdraft Facility | खात्यात Zero Balance, तरीसुद्धा काढू शकता Salary च्या तीनपट पैसे! जाणून घ्या काय आहे बँकांची ‘ही’ विशेष सुविधा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nanded Traffic Police | traffic police gets surpirse for duty in heavy rains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update