Coronavirus : नांदेडमध्ये ‘कोरोना’चा कहर ! समोर आले 134 नवे पॉझिटिव्ह तर 10 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 1528 वर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – (माधव मेकेवाड) – नांदेड जिल्ह्यात मंगळवार (दि. 28) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 134 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजवरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे व मृत्यूच्या आकड्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 134 रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1528 वर पोहचली आहे. आज 30 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 70 एवढी झाली आहे.

आतापर्यंत 12940 स्वॅब घेतले आहेत. त्यापैकी 10240 स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची संख्या सर्वाधिक आहे. आज 134 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1528 इतकी झाली आहे. तर मृत्यू झालेल्याची संख्या 70 एवढी झाली.

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण
पाठक गल्ली नांदेड येथे 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर किल्ला रोड, शिवाजी नगर, अंबिका नगर, शारदा नगर, हिंगोली गेट, शिवशक्ती नगर, भावसार चौक, हैदर बाग, मोमीन पुरा, दत्त नगर, स्टाफ जी एम सी, वाजेगाव नांदेड या नांदेड शहरातील कॉलनीमध्ये प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याचवेळी नांदेड शहरात शारदा नगर, हडको नांदेड, सिडको नांदेड येथे प्रत्येकी 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. नवीन कौठा नांदेड, दिलीप सिंह कॉलनी, गोवर्धन घाट येथे प्रत्येकी 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर (पॉझिटिव्ह रुग्ण- 02), देगलूर (पॉझिटिव्ह रुग्ण- 23), बिलोली (पॉझिटिव्ह रुग्ण-10 ), धर्माबाद (पॉझिटिव्ह रुग्ण- 07), हदगाव (पॉझिटिव्ह रुग्ण- 03), कंधार (पॉझिटिव्ह रुग्ण- 04), किनवट (पॉझिटिव्ह रुग्ण- 01), मुखेड (पॉझिटिव्ह रुग्ण- 22), नायगाव (पॉझिटिव्ह रुग्ण- 07), हिंगोली (पॉझिटिव्ह रुग्ण- 01), जालना (पॉझिटिव्ह रुग्ण- 01), पुसद (पॉझिटिव्ह रुग्ण- 01), परभणी (पॉझिटिव्ह रुग्ण- 02), वाहेगाव बेट सांगवी (01),लोहा (01) असे एकूण 134 रुग्ण नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्ह आले असल्याची अधिकृत माहिती नीलकंठ भोसीकर यांच्या कडून प्राप्त झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या 284 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 89 नमूने निगेटिव्ह आले आहेत व 134 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1528 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 770 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 677 आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 264 एवढी आहे. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.