बीडमधील कार अपघातात नांदेडचे पांडे दाम्पत्य ठार

कुसळंब (बीड ) : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडवरून पुणे येथे जात असताना झालेल्या कार अपघातात नांदेड येथील दांपत्याचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बीड -नगर मर्गावरील अंमळनेर जवळ आज दुपारी झाला. पांडुरंग दासराव पांडे (वय-५९) व उदया पांडुरंग पांडे (वय-५५) असे मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे. पांडुरंग पांडे हे सार्वजनीक बांधाक विभागातून ज्युनियर इंजिनीअर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

अपघातामध्ये पांडुरंग पांडे यांचा भाऊ ब्रम्हानंद दासराव पांडे (वय-४२) आणि पुतण्या प्रतिक ब्रम्हानंद पांडे (वय-१६) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबीय पुणे येथे खासगी कार्यक्रमासाठी कारमधून जात होते. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर नजीक दौलतवाडी येथे अचानक कार मुख्य रस्त्याच्या खाली कार पलटी होऊन ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये पांडे दांपत्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी श्रेयस पांडे (वय-२४) हा कार चालवत होता.

मयत पांडुरंग पांडे हे नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, जमादार फुलेवाड, गुंडाळे, आघाव, संतोष काकडे, शिणगारे, सानप आदींनी धाव घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like