Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूने भरलेला ट्रक सोडण्यासाठी एक लाखाची लाच मागून 70 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) मंडळ अधिकाऱ्याला (Board Officer) नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nandurbar ACB Trap) रंगेहाथ पकडले. प्रशांत निळकंठ देवरे Prashant Nilakant Deore (वय-42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. नंदुरबार एसीबीने (Nandurbar ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.27) रात्री उशिरा नंदुरबार तहसीलदार कार्यालय परिसरात केली.
याबाबत 37 वर्षाच्या व्यक्तीने नंदुरबार एसीबीकडे (Nandurbar ACB Trap) केली होती. प्रशांत देवरे यांनी 21 फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरातून वाळूने भरलेला ट्रक अडवून तहसील कार्यालयात जमा केला होता. हा ट्रक सोडवण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे सोमवारी एक लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणी पडताळणी केली असता प्रशांत देवरे याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करुन पहिला हप्ता 70 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेचा 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना प्रशांत देवरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. देवरे याच्यावर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात (Nandurbar Upnagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे
पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (Dhule ACBDySP Anil Badgujar),
नंदुरबार एसीबी पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण (Police Inspector Manjit Singh Chavan),
पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे (Police Inspector Prakash Zodge), पोलीस अंमलदार राजन कदम,
शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Nandurbar ACB Trap | Mandal officer caught in anti-corruption net while taking bribe of 70 thousand rupees to release sand truck
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update