Nandurbar Crime | अपघाताचा बनाव फसला अन् खुनाचं गुढ उकललं, नंदुरबार पोलिसांच्या एलसीबीची कामगिरी

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Crime | मुलीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरून शेतातील राखणदार आणि त्याच्या पत्नी व मुलीने लाकडी दांडक्याने डोक्यात घाव घालत खडीक्रेशरवर (Stone Crushers) काम करणार्‍या मजुराला (Laborer) जीवे ठार मारल्याचा गुन्हा उघडकीस (Nandurbar Murder Case Open) आला आहे. मजुराचा खून केल्यानंतर त्याचा अपघात झाल्याचा भासविण्यात आले. शेत राखणदाराने नंदुरबार (Nandurbar Crime) निझर रस्त्यावर पपईच्या शेताच्या बांधावर मृतदेह टाकून अपघात झाल्याचा बनाव कला. परंतु नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने (Nandurbar Local Crime Branch) चाणाक्ष पद्धतीने कसून तपास करीत गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती पत्राव्दारे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी दिली आहे.

 

नंदुरबार तालुक्यातील धमडाई फाट्यावर नंदुरबार ते निझर रस्त्यालगत पपईच्या शेताजवळ 35 वर्षीय इसमाचा मृतदेह मिळून आला. डोक्यासह पायावर व पाठीमागील बाजूस मार लागल्याच्या खूना मयताच्या मृतदेहावर होत्या. हा मृतदेह मनोहर व्यंकट पाटील यांच्या खडीक्रेशरवर काम करणार्‍या जामसिंग सुरसिंग ठाकरे (वय 35) यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांना पुणे येथे गुन्हे शाखा प्रमुख म्हणून काम केल्याचा अनुभव असल्याने त्यांनी घटनास्थळी सर्व बाबींची बारकाईन पाहणी केली. सदर घटना नंदुरबार एलसीबी शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. आणि खडीक्रेशरवर काम करणार्‍या मजुरांनाही विचारपुस केली. मयत जामसिंग ठाकरे यास दारू पिण्याची सवय असल्याने वाहनाच्या धडकेत त्यांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु पुन्हा पोलीसांनी मजुरांची भेट घेवून विचारपूस केल्यावर मयतासह दोन ते तीन मजुरांनी एकत्र येवून दारूची पार्टी केल्याचे समजले. (Nandurbar Crime)

त्या आधारावरही तपास केले असता हाती काहीच आले नाही. या घटनास्थळापासून नजीक असलेल्या मनोहर व्यंकट पाटील यांच्या शेतातील गोठ्यावरील राखणदार खेमा जेगला वळवी हा पेालीसांना टाळत असल्याचे निदर्शनास आले आणि त्याने विचारपुस केल्यावर उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलीसांनी गोठ्याच्या परिसराची पाहणी केली असता मागील बाजूस रक्ताचे डाग दिसून आले. त्यावेळी पोलीसांनी खेमा वळवी यास विश्वासात घेत विचारपूस केल्याने त्याने मयत जामसिंग ठाकरे याचा खून केल्याची कबूली दिली. कारण जामसिंग ठाकरे हा गोठ्यावर आल्यानंतर मुलीकडे वाईट नजरेने पाहत होता. त्यादिवशी तो दारू पिऊन आल्याने मुलाबाबात काहीतरी वाईट कृत्य करेल असा संशय घेत खेमा वळवीसह त्याची पत्नी व मुलीने लाकडी डेंगार्‍याने डोक्यावर घाव घालीत जामसिंग ठाकरे याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिघेही घाबरले आणि त्यावेळी खेमा वळवीच्या डोक्यात अपघाताची बनावाची कल्पना सूचली. त्यानुसार खेमा वळवी याने मयत जामसिंग ठाकरे याच्या पायाला दोराने बांधुन घेवून जात निझर रस्त्यालगत शेताच्या बांधावर मृतदेह टाकून अपघात झाल्याचा बनाव केला.

पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील (Superintendent Of Police P.R. Patil) यांनी केलेल्या निरिक्षण व नंदुरबार एलसीबीच्या पथकाने केलेल्या तपासामुळे अपघाताचा केलेला बनाव नसून तो खूनाचा गुन्हा उघडकीस झाला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar ,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar),
पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक दादाभाऊ मासुळ, विशाल नागरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, अभिमन्यु गावित, शोएब शेख, चापोना रमेश साळुंके यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nandurbar Crime | Accident fabricated mystery of murder solved performance of Nandurbar Police LCB

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा