Nandurbar Crime | धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत जीवे मारण्याचा प्रयत्न

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन –  Nandurbar Crime | नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे एक (Nandurbar Crime) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या पत्नीसाठी नवऱ्याने पहिल्या पत्नीला चक्क ‘शॉक’ (Electric shock) देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पती, त्‍याची दुसरी पत्नी आणि सासर्‍याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी तिरसिंग पटले (रा. तळोदा) असे पीडित महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, ही घटना 7 ऑक्टोबर 2021 रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पती मुकेश जयसिंग खर्डे (Mukesh Jaisingh Kharde) आणि त्यांची दुसरी पत्नी गीता खर्डे यांनी आमच्या घरातून निघून जा, असा तगादा लावला.
यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले.
पती मुकेश आणि गीता या दाेघांनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.
आमच्‍या घरातून निघुन जा, असे सांगत सासरे जयसिंग यांनी देखील शिवीगाळ (Nandurbar Crime) करुन ढकलून दिले.
असं फिर्यादी महिलेनं सांगितलं आहे.

त्याचबरोबर, पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने लक्ष्‍मी (Lakshmi) यांचा हात धरुन घरातील इलेक्ट्रीक बल्ब सॉकेट जवळ ओढत नेले.
तेव्हा शॉक लागल्याने लक्ष्मी खर्डे या जमीनीवर कोसळल्या आणि बेशुध्द झाल्या.
दरम्यान, तळोदा तालुक्यातील मालदा येथे मुकेश याच्या खर्डे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Taloda Police Station) गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस (Nandurbar Crime) करत आहेत.

 

Web Title : Nandurbar Crime | the second wife and husband tried to beat the first wife with a direct electric shock incident in taloda police station area of nandurbar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | तृतीय पंथ्यांचं वेषांतर करून चोऱ्या करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Indian Currency | चलनी नोटा कशा तयार केल्या जातात? तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

TRAI Channel List | 1 डिसेंबरपासून TV पाहणे देखील महागणार, करावा लागेल 50 टक्केपेक्षा जास्त खर्च