Accident in Toranmal | नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातील तोरणमाळ (Accident in Toranmal) खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणारी खासगी क्रूजर (Cruser) गाडी दरीत कोसळली. तोरणमाळ (Accident in Toranmal) येथे झालेल्या अपघातात क्रूजरमधील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू (8 died on the Spot) झाला. प्राथमिक माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी गाडीत 15 हून अधिक प्रवासी होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर सिंधी गावाकडे जाणारी क्रूझर गाडी दरीत कोसळली. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातात 8 जण ठार झाले. हा अपघात रविवारी (दि.18) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींवर तोरणमाळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. क्रूझर दरीत कोसळण्यापूर्वी काही प्रवाशांनी गाडी बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अपघाताची माहिती मिळताच सायंकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षकांसह (Superintendent of Police) अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुर्गम भाग असल्याने कव्हरेज नसल्याने माहिती मिळण्यास अडचण येत आहे.

Web Titel :- nandurbar district a car crashed into a ravine and caused a terrible accident 8 killed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक