Nandurbar LCB Police | शेतजमीन व दागिन्यांसाठी बहिणीला संपवलं; खून प्रकरणाचा नंदुरबार पोलिसांकडून पर्दाफाश

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar LCB Police | शेतजमीन व दागिन्यांसाठी मोठ्या बहिणीचा खून (Elder Sister Murder) करणाऱ्या भावाला नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar LCB Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch, Nandurbar) अटक (Brother Arrest) केली आहे. पोसल्या नागोऱ्या वळवी Poslya Nagorya Valavi (वय-55, रा. निजामपुर, ता. नवापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने बहिणीचा खून करुन ती बेपत्ता झाल्याची तक्रार विसरवाडी पोलीस ठाण्यात (Visarwadi police station) दिली होती.

 

साकुबाई सुपड्या वळवी Sakubai Supadya Valavi (वय-65 रा. निजामपुर ता. नवापुर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साकुबाई या 23 फेब्रुवारी 2022 रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर 18 मे 2022 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचा मृतदेह कोरड्या नाल्यात सुती गोणपाटात दोरीने बांधलेला आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर पाटील (SP P. R Patil) यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

 

पोलिसांनी (Nandurbar LCB Police) दिलेल्या माहितीनुसार, साकुबाई वळवी या पतिच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. त्यांना मुल-बाळ नसल्याने त्यांचा सांभाळ करण्यास कोणीच नव्हते. त्यांचा भाऊ त्याच गावात राहत होता. परंतु तो देखील त्यांचा सांभाळ करत नव्हता. साकुबाई एकट्याच शेती करुन आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान साकुबाई बेपत्ता झाल्याची तक्रार भाऊ पोसल्या वळवी याने दिली होती.

विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 18 मे रोजी कोरड्या नाल्यात असलेल्या गोणपाटातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोसल्या नोगऱ्या वळवी याला घटनास्थळी बोलावून घेतले. त्याने मृतदेहाच्या अंगावरील कपड्यावरुन मृतदेह साकुबाई हिचा असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पटली असली तरी आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी (दि. 20) पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (IPS PR Patil) यांना माहिती मिळाली की, दोन ते तीन महिन्यापूर्वी मयत साकुबाई हिचा भाऊ पोसल्या हा नंदुरबार येथे चांदीचे दागिने (Silver Jewelry) विकण्यासाठी आला होता. मिळालेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देऊन पोसल्या वळवी याला ताब्यात घेण्याचे आदेश पी आर पाटील यांनी दिले.

 

पोसल्या वळवी याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, धक्कादायक माहिती दिली.
मयत साकुबाई ही पोसल्या वळवी याची मोठी बहिण होती. तिला पती, मुल-बाळ वगैरे नव्हते.
तसेच पोसल्याची पत्नी सतत आजारी असल्यामुळे तिच्या औषोधोपचारासाठी त्याला पैशांची गरज होती.
तसेच पोसल्या आणि मयत साकुबाई यांच्यामध्ये जमीनीच्या हिस्स्यावरुन अनेक दिवसांपासून वाद सुरू होते.
दोन ते तीन महिन्यापूर्वी साकुबाई हिला रात्रीच्या वेळी तिच्या घरात मारुन मृतदेह एका गोणपाटात टाकला.
गोणपाट घरी आणून तिच्या अंगावरील दागीने  काढून ते नंदुरबार येथील सोनाराला विकल्याचे पोसल्याने सांगितले.
काही दिवसांनंतर मृतदेहाचा वास येत असल्यामुळे आरोपीने मृतदेह गावाच्या लगत असलेल्या कोरड्या नाल्यात टाकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar),
उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Deputy Divisional Police Officer Sachin Hire)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar),
सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी (ASI Anil Gosavi), पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, महेंद्र नगराळे,
विनोद जाधव, राकेश वसावे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, बापू बागुल, जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे,
जितेंद्र अहिरराव, सुनिल पाडवी, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे, राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nandurbar LCB Police | Murder of sister for farmland and jewelry; Nandurbar police exposes murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जमिनीतून ‘धन’ काढून देण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक

 

Pune Crime | पुण्यातील कार शोरुमची 42 लाखाची फसवणूक, सेल्स मॅनेजरवर FIR

 

PMJJBY And PMSBY | ‘या’ 2 विमा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान