Nandurbar LCB Police | वृद्धाला लुटणारा ‘पुष्पा’ अखेर गजाआड, नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar LCB Police | गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातील शहदा तालुक्यातील डामरखेडा येथील 75 वर्षीय वृद्धाचे 50 हजार रुपये प्रकाशा येथून चोरीला गेले होते. पत्नीचे कोरोनामुळे (Corona) निधन झाल्यामुळे सानुग्रहाची रक्कम बँकेतून घेऊन जाताना त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्या वृद्धा बद्दल लोकांमध्ये सहानुभूतीची लाट पसरली. दुसरीकडे नंदुरबार पोलीसांनी (Nandurbar LCB Police) वर्गणी काढून त्याला पैसे दिल्याने पोलीसांची प्रतिमा उजळली.  त्या वृद्धाचे पैसे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद (Arrest) करुन पोलीस अधीक्षकांनी त्या वृद्धास “तुमचे पैसे परत मिळवून देऊ” असा दिलेला शब्द खरा केल्याने नंदुरबार पोलींसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नंदुरबार (Nandurbar Crime) पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (SP P.R. Patil) यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 10 हजार रुपयांच बक्षिस जाहिर केले आहे.

 

मिठू उर्फ विनोद वीरसिंग पवार Mithu alias Vinod Veer Singh Pawar (वय 22)  व राजू गिरीष मावेशी Raju Girish Maveshi (वय-21 दोघे रा. धनपूर ता.तळोदा जि.नंदुरबार) अशी अटक करण्यात आलेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत. चोरीची घटना घडल्यानंतर 75 वर्षांच्या पदम कोळी (Padam Koli) या वृद्धाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले बाबतचे सानुग्रह अनुदानाचे पैसे चोरीला जाणे. पोलीसांनी वर्गणी काढून या वृद्धास पैसे देणे यामुळे या घटनेला भावनिक टच मिळाला होता. (Nandurbar LCB Police)

 

 

आठवडाभरापासून नंदुरबार पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीसांना हे चोर पकडून देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखेची (Local Crime Branch) दोन खास पथके तपासासाठी नेमली होती. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण शहादा व तळोदा तालुका पिंजून काढला. चोरट्यांने हेअर कटिंग मध्ये “PUSHPA” अशी अक्षरे कोरल्याची माहिती घटनास्थळावरील लोकांनी सांगितल्याने अथक परिश्रमाने ती अक्षरे कोरणारा सलून कारागीर शोधून काढला. त्याच्या मदतीने विनोद उर्फ मिठू याला अटक केली. घटनेची चर्चा झाल्यानंतर चोरट्यांची चोरलेले पैसे खर्च करण्याची हिंमत झाली नाही तर दुसरीकडे पदम कोळी यांनीही पोलीसांनी वर्गणी काढून दिलेले पैसे खर्च केले नव्हते.

आज शहादा पोलीसांनी चोरांना पकडल्याचे पदम कोळी यांना कळवल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे शहादा पोलींसांनी त्यांची भेट घालून दिली. वयोवृद्ध पदम कोळी यांनी त्यांना पाहताच आनंदाने मिठी मारली व सोबत आणलेला फुलांचा गुच्छ त्यांना दिला. पोलीसांनी वर्गणी काढून दिलेले पैसे परत करण्याचा प्रामाणिक असलेल्या पदम कोळी यांनी प्रयत्न केला. परंतु त्यास नकार देऊन “तुमच्या पोलीस मुलांनी तुम्हाला दिलेली ती भेट आहे असे समजा” असे म्हणताच वयोवृद्ध पदम कोळी भावनिक झाले होते. पत्नीची आठवण असलेले चोरीला गेलेले पैसे परत मिळाल्यांने पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेल्या कोळी आजोबांना पहायला नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.

 

 

या बहुचर्चित चोरीची उकल करण्यासाठी  नंदूरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या थेट देखरेखीखाली
अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar) व स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar) यांनी मेहनत घेतली.
या कामगिरीमुळे नंदुरबार पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Web Title :- Nandurbar LCB Police | Pushpa, who robbed an old man, finally local crime branch of Nandurbar arrest criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

 

BJP MLA Suspension Revoked | अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 335 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी