नंदुरबारमधून पुन्हा ‘हीना गावित’च

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हीना गावित विजयी झाल्या आहेत. नंदुरबारमध्ये भाजपकडून हीना गावित तर कॉंग्रेसकडून के. सी. पडवी तर वंचित बहुजन आघाडीकडून दाजमल गजमल मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या लढतीत हीना गावित ९५,२९६ मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या हीना गावित यांना ६,३७,२२६ मते पडली तर काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना ५,४१,९३० मते पडली. धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार ११७ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण १२ लाख ७७ हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६८.३३ % टक्के मतदान झाले.

नंदुरबार या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु २०१४ मध्ये भाजपने खिंडार पडले. या मतदारसंघात १९६७ पासून ते २००९ पर्यंत म्हणजे ४२ वर्षे सातत्याने १३ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय झालेला आहे. २०१४ मध्ये भाजपच्या हीना गावित यांनी नवखा चेहरा असूनही त्यांनी नंदुरबारचे नऊ वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा हीना गावित यांना मिळाला होता. गावित यांनी एमबीबीएसच्या शिक्षणादरम्यान निवडणूक लढली होती. त्या महाराष्ट्राचे माजी मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये भाजपच्या हीना गावितांनी ५,७९,४८६ मते मिळवली होती. तर काँग्रेसतर्फे माणिकराव गावितांना ४,७२,५८१ मते मिळाली होती.

नंदुरबार मतदार संघ
एकूण मतदार – १८ , ७० , ११७

एकूण मतदान – ६८.३३ %

विजयी उमेदवार – हीना गावित

मिळालेली मते – ६,३७,२२६