Nandurbar News | नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar News | नंदुरबार (Nandurbar Nagar Palika) व शहादा नगरपालिकांना (Shahada Nagar Palika) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijay Kumar Gavit) यांनी आज दिल्या आहेत. (Nandurbar News)

नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ.हिना गावित (MP Dr. Heena Gavit), नंदुरबार न.प. मुख्याधिकारी पुलकित सिंह (Pulkit Singh IAS), शहादा नगरपालिकेचे स्वप्नील मुधलवाडकर (Swapnil Mudhalwadkar) आदी उपस्थित होते. (Nandurbar News)

यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले की, राज्य शासनाकडून तसेच जिल्हा वार्षिंक योजनेतून नगरपरिषदांना 115 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामांचे अंदाजपत्रके, नकाशे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्तावांना त्वरीत मंजूरी देवून हा निधी विहीत वेळेत खर्च करावा. नंदुरबार व शहादा नगरपालिका हद्दीतील जुन्या वसाहतींच्या ठिकाणी नवीन रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. ज्या भागात रस्ते, वीज, गटारी व पिण्याच्या पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी नागरिकांना सर्व मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत रस्ते व डि.पी रोडची प्रस्तावित कामे त्वरीत करावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेत वाचनालय, युवक माहिती केंद्र, अभ्यासिकांची बांधकामे करावित. आदिवासी उपयोजनेत तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत मंजुर निधींची कामे करतांना ज्या भागात यासमुहांची लोकवस्ती असेल अशाच ठिकाणी निधी खर्च करण्यात यावा.

 

नागरिकांच्या सुरक्षितेसाठी नंदुरबार, शहादा शहरातील सीसीटीव्ही प्रणाली लावण्यासाठी आराखडा तयार करावा.
तसेच नंदुरबार व शहादा शहरातील महत्वांच्या ठिकाणी सिंग्नल व पार्कींगची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. बैठकीस नगरपालिका शाखेचे अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

 

Web Title :-  Nandurbar News | Funds approved for Nandurbar, Shahada cities should be spent on time –
Palak Minister Dr.Vijaykumar Gavit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक

Maharashtra Registrars Office Open On Holiday | घर खरेदी-विक्री नोंदणी करणार्‍यांसाठी गुड न्यूज !
आता सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार