Nandurbar News | अर्ध्यावरच प्रवास थांबला ! दरड कोसळल्याने घाट बंद, उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन जात असताना पत्नीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन –  Nandurbar News |महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा घटना घडत आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना नंदुरबार (Nandurbar News) मध्ये घडली आहे. मुसळधार पावसात दरड कोसळून मार्ग बंद (Road closed due to landslide) झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा तडफडून (woman dies due to no treatment) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील चैंदसैली (Chandsaili Nandurbar) येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारमधील चांदसोली येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाल्याने नागरिकांना शहराकडे जाण्याचा मार्ग राहिला नाही.
सिदलीबाई पाडवी ही महिला आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते.
परंतु घाट रस्ताच बंद असल्याने अखेर पतीने आपल्या पत्नीला खांद्यावर टाकून पायपीट सुरु केली.

अर्ध्यावर प्रवास संपला

आपल्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार व्हावेत यासाठी पतीने पायपीट केली. मात्र, पतीच्या या प्रयत्नाला यश आले नाही.
पत्नीला जिल्हा रुग्णालयात (district hospital) उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सिदलीबाई यांनी अर्ध्यावाटेतच आपले प्राण सोडले.

 

13 वर्षाच्या मुलीचा तडफडून मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर आला असून येण्याजाण्यासाठी नदीवर पूल नाही.
13 वर्षाची आरुषी ही मुलगी तापाने फणफणली होती.
परंतु नदीवर पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून उपचारासाठी नेता आले नाही.
तसेच गावात डॉक्टर नसल्याने अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारासाठी नेण्यासाठी नदी काठावर आणले. काही तरी प्रयत्न करु.. पण दुर्दैव.. नदीकाठावर आदिवासी आरुषीने अखेरचा श्वास घेतला.
यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title : Nandurbar News | shocking woman died because of no treatment as road closed due to landslide after heavy rainfall in nandurbar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | एकटीला बघुन रुममध्ये घुसला अन्.., महिला IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत केलं विकृत कृत्य

Assembly Elections 2022 | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची मोठी तयारी; फडणवीसांवर सोपवली नवी जबाबदारी

Pune Metro | …तोपर्यंत लकडी पुलावरील मेट्रोचे काम थांबविण्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आदेश