धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात 5 ठार तर 35 जखमी

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गा (Dhule-Surat National Highway) वरील कोंडाईबारी घाटात ( Kondaibari Deficit) एक भीषण अपघात ( Accident) झाला आहे. जळगावहून सूरतकडे जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलावरून ४० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जण जखमी झाले आहेत.

या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर विसरवडी, नवापूर व नंदुरबार( Nandurbar) मधल्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले. घटनास्थळावरून ५ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. हा अपघात कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. अपघातावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते.