Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलाच्या ‘अक्षता समिती’ने थांबविला बालविवाह

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह गुरुवारी (दि.30) होणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे (Nandurbar Police) पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांना समजली. बालविवाहाची (Child Marriage) माहिती समजताच ‘अक्षता समिती’च्या (Akshata Samiti) पथकाने तिथे जाऊन बालविवाह थांबविला. तसेच वधू-वरांच्या पालकांमध्ये जागृती करुन नियमांनुसार वय पूर्ण झाल्यावर नियोजित विवाह करण्याच्या सूचना दिल्या.

बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कार्यालयातील ( Nandurbar Police) अक्षता सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे (API Naina Deore) व त्यांचे पथक तातडीने अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी पोहोचले. त्यांनी पोलीस ठाणे स्तरावर स्थापन केलेल्या अक्षता समितीचे सदस्य ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा स्वंयसेविका यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या मुलीची माहिती काढली. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असून ती 14 वर्षे 2 महिन्यांची असल्याची माहिती मिळाली. तसेच तिचा विवाह गुजरात मधील तापी जिल्ह्यातील देवरुखली गावातील तरुणासोबत करण्यात येणार होता. मात्र नंदुरबार पोलिसांच्या अक्षता सेलने होणारा बालविवाह थांबविला.

याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेश अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या बालविवाहाच्या मोठ्या समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल, असा विश्वास पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे
(Addl SP Nilesh Tambe), अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत (SDPO Sambhaji Sawant),
स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI Kiran Kumar Khedkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे (API Dhanraj Neele),
अक्षता सेलचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे, पोलीस अंमलदार अभिमन्यु गावीत, दिलीप न्हावी, अरुणा मावची,
वालंबा काठीचे सामाजिक कार्यकर्ते धीरसिंग पाडवी, ग्रामसेवक शांतीलाल बावा, अंगणवाडी सेविका शिवाजीबाई पाडवी यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Nandurbar Police | ‘Akshata Samiti’ of Nandurbar Police Force stopped child marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी