Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात, 1 हजार विद्यार्थ्यांना दिली शपथ

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवावी अशी संकल्पना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (Nashik District Special Inspector General of Police Dr. B. G. Shekhar Patil) यांनी मांडली होती. डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी केलेल्या आवाहनाला 24 तासांच्या आत प्रतिसाद देत नंदुरबार जिल्ह्याचे (Nandurbar Police) पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP PR Patil) यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी अभियानास (Anti Narcotics Campaign) सुरुवात केली. बुधवारी (दि.1) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या (Nandurbar Police) वतीने अभियानाची सुरूवात करण्यात आली. डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी बोलताना डॉ. बी. जी. शेखर पाटील म्हणाले, पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असतांना अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढून नवीन जीवन मिळवून दिल्याचे उदाहरण त्यांनी दिले. तरुण पिढी हे राष्ट्राचे भविष्य असून त्यांनी उज्वल भविष्यासाठी स्वतःच्या व वैयक्तीक आरोग्यासाठी अंमली पदार्थ सेवन न करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे असे आवाहन डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी केले.

या कार्य़क्रमात पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुष्परीणाम व किशोरवयात या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास त्याचे काय फायदे होतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी संकल्पनेची शपथ दिली.

अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या या कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जी.टी. पी. महाविद्यालय,
श्रॉफ हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल, भामरे क्लासेस, अभिनव विद्यालय, पी. जी. पब्लिक स्कुल या शाळा व
महाविद्यालयांचे सुमारे एक हजार विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (Police Inspector Kiran Kumar Khedkar),
पोलीस निरीक्षक राहूल पवार (Police Inspector Rahul Pawar), नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे (Nandurbar City Police Station)
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar),
उपनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे (API Dinesh Bhadane)
यांच्यासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे (Nandurbar City Police Station) अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

 

Web Title :- Nandurbar Police | Anti-narcotics campaign started by Nandurbar police, 1000 students took oath

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)