Nandurbar Police | बंदुकीच्या धाकाने शेतकर्‍यांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला नंदुरबार पोलिसांकडून 30 तासात अटक, 21 लाखाचा ऐवज जप्त

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | गुजरात राज्यातील कडी येथे कापुस विकून घराकडे परत निघालेल्या शेतकर्‍यास नंदुरबार शहरातील भालेर रोडच्या होळ गावाकडे जाणार्‍या फाटयाजवळ बंदुकीचा धाक दाखवुन त्यांच्याकडील 13 लाख 94 हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Nandurbar LCB) अवघ्या 30 तासात अटक केली आहे (Nandurbar Crime News). त्यांच्याकडून रोख रक्कमेसह तब्बल 21 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती नंदुरबार जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी दिली आहे. (Nandurbar Police)

 

उमेश आत्माराम पाटील (42, रा. जुनवणे, ता.जि. धुळे), चैत्राम उर्फ झेंडु राजधर पाटील (41), सागर उर्फ बंटी सुभाष पाटील (24), दिपक उर्फ बबलू सुभाष पाटील (26, तिघे रा. धामणगांव, ता.जि. धुळे) आणि राहुल बळीराम भोई (25, रा. शिरूड, ता.जि. धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13 लाख 26 हजार 540 रूपये रोख, 25 हजार रूपये किंमतीचे लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रूपये किंमतीचे 4 जिवंत काडतुसे, 200 रूपये किंमतीचा एक लोखंडी धारदार चाकू, 50 हजार रूपये किंमतीचे 5 वेगवेगळया कंपनीचे मोबाई आणि गुन्हयात वापरलेले 7 लाख रूपयाचे वाहन असा एकुण 21 लाख 2 हजार 940 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nandurbar Police)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 10 मार्च रोजी शेतकरी असणारे सुनिल गंगाराम पाटील आणि त्यांचे भाऊ हसंराज दगाजी पाटील (रा. भालेर, जि. नंदुरबार) हे त्यांचा कापुस गुजरात राज्यातील कडी येथे विकुन रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीने घरी जात होते. नंदुरबार शहरातील भालेर रोडच्या होळ गावाकडे जाणार्‍या फाटयाजवळ त्यांच्या गाडीच्या पुढे एक पांढर्‍या रंगाची चारचाकी आली. त्यामधील चार अनोळखींनी त्यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून त्यांना बंदुकीचा धाक दाखविला. त्यांच्याकडून 13 लाख 94 हजार रूपये जबरदस्तीने लुटले. काही वेळातच घटनेची माहिती नंदुरबार पोलिसांना मिळाली. गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील आणि इतर सर्व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि संवेदनशील होता. सुनिल गंगाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात (Nandurbar City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

फिर्यादीने पोलिसांना आरोपी हे एमएच 04 क्रमांकाच्या एका पांढर्‍या चारचाकीतून आले असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी जिल्हयात तसेच जिल्हयाच्या शेजारील भागात सर्वत्र नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. मात्र, अंधाराचा फायदा घेवुन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटना निर्जन स्थळी व अंधारात घडल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळणे शक्य नव्हते. वर्षभर शेतात कष्ट करून पैसे जमवणार्‍या शेतकर्‍याच्या पैशावर दरोडेखोरांनी डल्ला मारल्याने शेतकरी कुटूंब हवाललिद झाले. त्यावेळी पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी त्यांना तुमच्या मेहनतीचे पैसे चोरणार्‍या चोरांना आम्ही लवकरच बेडया ठोकू व तुमचे चोरी झालेले पैसे देखील हस्तगत करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू असे सांगितले. दरम्यान, दि. 11 मार्च रोजी पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भालेर रस्त्यावर शेतकर्‍यांना लुटणार्‍या संशयित आरोपीतांचे फिर्यादी सोबत गुजरात राज्यात कापुस विक्रीसाठी गेलेल्या व्यापार्‍यांचे संबंध असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना संबंधितांना ताब्यात घेवून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

शेतकर्‍यांचा माल घेवून गेलेल्या गाडीचा चालक व सोबत असलेल्या कापुस व्यापार्‍याकडे चौकशीस सुरूवात झाली.
कापूस व्यापारी उमेश पाटील हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी तो देत असलेल्या माहितीतील विसंगती त्याच्या लक्षात आणून देवून त्यास बोलते केले.
त्यानंतर तो पोपटासारखे बोलू लागला आणि त्याने सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 21 लाखा रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

 

नंदुरबार जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
नंदुरबारचे उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे (SDPO Sachin Hire)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI Kirankumar Khedkar),
सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil) आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Web Title :- Nandurbar Police | Gang of robbers who robbed farmers at gunpoint arrested by Nandurbar police within 30 hours, 21 lakhs seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cucumber Benefits | उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे, आरोग्यासाठी ‘या’ बाबींमध्ये विशेष फायदा

Hair Care Tips | Summer मध्ये आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन