Nandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | पोलीस महासंचालक कार्यालयाने (DGP Office, Mumbai) सन 2021 मधील राज्यातील सर्व पोलीस घटकांचे दोषसिद्धी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) घटकात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण 92.93 टक्के इतके असल्याने राज्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दल अव्वल ठरले आहे. याबाबतचे पत्र नंदुरबारच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाला (Office Of Nandurbar Superintendent of Police) प्राप्त झाले आहे.

 

गुन्हे दोषसिद्धीसाठी म्हणजे आरोपींना दोषी सिद्ध होऊन शिक्षा होईपर्यंतचा परिणाम साधणारे काम करण्यासाठी नियोजनबद्ध कामकाज करण्यासाठी विशिष्ट पद्धत अवलंबवण्यात आली आहे.
यात पोलीस अधीक्षक पी. आर पाटील (SP PR Patil)  यांच्या सुचनेनुसार नंदुरबार पोलीस (Nandurbar Police)
दलामार्फत 5 कलमी कोर्ट कमिटमेंट सारखे उपक्रम आणि विशेष उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाल्यापासून अतिगंभीर,
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा (Accused Punishment) होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे अपराध सिद्धि व गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणण्याकरीता नेहमीच विविध उपाययोजना केल्या जातात.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (Superintendent of Police PR Patil) व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Additional Superintendent of Police Vijay Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलामार्फत तपास वेळेत व उत्कृष्ट करणे, समन्स वॉरंट बजावणी बाबत पोलीस ठाणे प्रभारी व संबंधित अंमलदार यांनी दैनंदिन आढावा घेणे, पोलीस अधिकारी, अंमलदार व सरकारी वकील (Public Prosecutor)
यांनी साक्षी आगोदर एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवणे, पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे,
उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबितीकरता प्रोत्साहनपर बक्षीस देणे असे उपक्रम राबवले जातात.

नंदुरबार जिल्ह्यातील खटल्यांचे 2021 मध्ये एकंदर शिक्षेचे प्रमाण 92.93 टक्के आहे.
तपास अधिकारी (Investigating officer) यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचे तपासात न्यायालयात (Court) दाखल खटल्यात दोषसिद्धी झाल्यावर तपास अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी, मुख्य पैरवी अधिकारी यांना प्रोत्साहनपर रोख स्वरुपात रक्कम बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाते.
तसेच निवृत्त पोलीस तपासी अधिकारी (Retired police investigating officer),
अंमलदार यांना त्यांनी केलेल्या गुन्हे तपासात दोषसिद्धी झाल्यावर त्यांचा सत्कार केला जातो.
पोलीस दल व सरकारी वकील, अभियोक्ता यांच्यात झालेल्या समन्वयामुळे नंदुरबार जिल्ह्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar district police force tops in crime investigation in Maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा