Nandurbar Police | बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून लुटणारे दोन परप्रांतीय नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात, लुटलेली 1 लाखांची रक्कम जप्त

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून रक्कम चोरणाऱ्या (Robbery) दोघांना नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरलेली एक लाखाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली आहे. नंदुरबार शहरामध्ये (Nandurbar City) परराज्यातील लोक नागरिकांवर पाळत ठेवून त्यांची नजर चुकवून पैसे चोरत असल्याचे समोर आले आहे.

 

निम नेमीलाल गुज्जर (वय-20 रा. गुरवा नगर, बिचौली मर्दाना, बिचौली खेडे, ता. जि. इंदौर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथिदाराला नंदुरबार पोलिसांनी ताब्यात (Nandurbar Police) घेतले आहे. याबाबत महेंद्र शामराव मराठे Mahendra Shamrao Marathe (रा. जगतापवाडी) यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) 1 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मराठे यांनी 1 फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मधून एक लाख रुपये काढले होते. बँकेतून काढलेली रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवून ते शहरातील नगर पालिका चौकात खरेदी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून रक्कम चोरून नेली. परत आल्यानंतर त्यांनी गाडीची डिक्की तपासली त्यावेळी डिक्कीत पैशांची पिशवी नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून नंतर त्यांचा पाठलाग करुन रक्कम चोरी करणारी टोळी नंदुरबार शहरात सक्रीय झाल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर पाटील (Superintendent of Police PR Patil) यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक रविंद्र कमळकर (Police Inspector Ravindra Kamalkar) व त्याची दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरुन आरोपींचा शोध घेत असताना अशा प्रकारचे गुन्हे हे नंदुरबार जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौर (Indore), राजपुर (Rajpur) येथील गुन्हेगार अल्पवयीन मुलांच्या मदतीने करत असल्याचे लक्षात आले. तसेच हे लोक शहराच्या बाहेर वस्ती करुन राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक अल्पवयीन मुलगा व एक तरुण संशयास्पद हालचाली करुन पळून जाताना दिसले.

 

पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या दोघांचा शोध घेत असताना बुधवारी (दि.16) पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर
यांना माहिती समजली की, नंदुरबार शहरातील कोरीट चौफुली (Korit Chaufuli)
येथे मध्य प्रदेशातील इंदौर येथून काही लोक आले असून ते बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून पैशांची चोरी करणारे आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ त्याठिकाणी धाव घेऊन संशयित आरोपीचा शोध घेतला.
त्यावेळी आरोपी एका चहाच्या टपरीवर चहा पिताना पथकाला दिसला. पथकाने सापळा रचला.
आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
तसेच तो राहात असलेल्या झोपडीतून एक लाख रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जिजाबराव (API Sandeep Jijabrao),
पोलीस हवालदार गुलाबराव सोनवणे (PSI Gulabrao Sonawane), पोलीस नाईक राकेश मोरे,
पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपुत, आनंदा मराठे, अभिमन्यु गावीत, शोएब शेख, चालक पोलीस नाईक रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Nandurbar Police | Nandurbar police arrest 2 robbers, seize Rs 1 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nandurbar Police | चोरीला गेलेली एक लाखाची रक्कम परत मिळवून देणाऱ्या नंदुरबार पोलिसांचा ‘सत्कार’ आणि ‘आभार’

 

Shivsena Leader Sudhir Joshi | नगरसवेक ते मंत्रिपदापर्यंतचा सुधीर जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास, वाचा एका क्लिकवर

 

Pune Municipal Corporation (PMC) | विरोधकांवर महापालिकेच्या जागा बळकवल्याचा आरोप करणार्‍या सत्ताधार्‍यांनीच स्वपक्षाच्या नगरसेवकांवर केली जागांची खैरात