Nandurbar Police | चोरीला गेलेली एक लाखाची रक्कम परत मिळवून देणाऱ्या नंदुरबार पोलिसांचा ‘सत्कार’ आणि ‘आभार’

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून रक्कम चोरणाऱ्या (Robbery) दोघांना नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक केली आहे.  नंदुरबार पोलिसांनी आरोपींना अटक करुन चोरीला गेलेली रक्कम परत मिळवून दिली. याबद्दल नंदुरबार पोलिसांचे (Nandurbar Police) आभार मानत त्यांचा सत्कार फिर्यादी महेंद्र शामराव मराठे (Mahendra Shamrao Marathe) यांनी केला आहे.

महेंद्र मराठे आणि त्यांच्या पत्नीने 1 फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) येथून एक लाख रुपये काढले होते. ही रक्कम एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर ते खरेदी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली. गाडीजवळ कोणी नसल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी चोरून (Stealing) नेली. याबाबत त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) तक्रार दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करुन नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) दोघांना 16 नोव्हेंबर रोजी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून मराठे यांची चोरलेली रक्कम जप्त केली. मराठे यांची चोरीला गेलेली रक्कम त्यांना काल (बुधवारी) परत करण्यात आली.
चोरीला गेलेली रक्कम परत मिळाल्याने मराठे यांनी पोलिसांचा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

 

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar Police felicitated for recovering Rs 1 lakh stolen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Municipal Corporation (PMC) | विरोधकांवर महापालिकेच्या जागा बळकवल्याचा आरोप करणार्‍या सत्ताधार्‍यांनीच स्वपक्षाच्या नगरसेवकांवर केली जागांची खैरात

 

Coronavirus in Maharashtra | राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्या स्थिर, गेल्या 24 तासात 6383 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

 

How To Relieve Stress Quickly | चुटकीसरशी गायब करायचा असेल ‘स्ट्रेस’ तर जाणून घ्या तणाव दूर करण्याच्या 7 सोप्या पद्धती