Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा रोखला बालविवाह ! 8 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव, एसपी पी.आर. पाटील यांचा पुढाकार

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | बालविवाहांना प्रतिबंध करणे (Prevention Of Child Marriages) तसेच महिलांबाबतच्या कौटुंबिक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना आखण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP PR Patil) यांच्या संकल्पनेतुन दि. 8 मार्च 2023 रोजी जिल्ह्यात ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आजपर्यंत तब्बल 603 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान, नंदुरबार पोलिसांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा (Prakasha Shahada) येथे एक बालविवाह रोखला आहे. यापुर्वी देखील नंदुरबार पोलिसांनी अनेक बालविवाह रोखले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली आहे. (Nandurbar Police)

 

गुजरात राज्यातील नवसारी येथील एका अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुलासोबत दि. 30 एप्रिल 2023 रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती दि. 29 एप्रिल 2023 रोजी एसपी पी.आर.पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा स्तरावरील अक्षता समितीच्या सदस्या नयना देवरे (Nayana Devre) यांना याबाबत माहिती दिली आणि सदरील बालविवाह थांबविण्याचे आदेश दिले. मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत देखील सांगितले. (Nandurbar Police)

अक्षता समितीच्या सदस्यांच्या मदतीने पोलिसांनी माहिती काढली असता प्रकाशा येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे समजले. विवाहाच्या वेळी वधु येथे येणार असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी वधूच्या जन्म तारखेबाबत विचारपूस केली. त्यामध्ये मुलीचे वय 16 वर्ष 8 महिने असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पालकांचे समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले आणि वधू मुलास व त्यांच्या नातेवाईकांना शहादा पोलिस स्टेशनकडून (Shahada Police Station) नोटीस देण्यात आली. अशा प्रकारे नंदुरबार पोलिसांनी प्रकाशा येथील बालविवाह रोखला.

पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
शहादा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे (SDPO Srikanth Ghumre) यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह समितीच्या सदस्या नयना देवरे,
पोलिस नाईक विकास कापूरे, पुरूषोत्तम सोनार, मेहरसिंग वळवी, कृष्णा जाधव यांच्या पथकाने बालविवाह रोखला आहे.

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar police once again stopped child marriage!
Anti-child marriage resolution in 602 Gram Panchayats of the district from March 8 till date, SP PR. Patil’s initiative

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Vidyarthi Griha | पुणे विद्यार्थी गृहाचा मुद्रणातील भरीव कामगिरीबद्दल नवी दिल्लीतील ‘टेकफोरडी’ शैक्षणिक प्रदर्शनात सन्मान

Sharad Pawar Resigns | शरद पवार निवृत्ती मागे घेणार?, समितीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निर्णय मान्य…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – व्यापार्‍यास बेदम मारहाण करून खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

Jal Jeevan Mission Maharashtra | ‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख