Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

नंदुरबार : Nandurbar Police | महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील चंदनाची झाडे कापून तिची मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील चदंनाच्या कारखान्यात विक्री करणार्‍याचा प्रकार नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) उघडकीस आणला आहे. या चंदनाच्या कारखान्यावर नंदुरबार पोलिसांनी छापा टाकून तेथून १७ लाख ७२ हजार रुपयांचे चंदनाचे तेल, लाकुड असा माल जप्त केला आहे. तसेच चंदनाचे तेल व लाकुड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे ७ लाखांचे ट्रकही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ८ जणांना अटक केली आहे.

नवापूर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणार्‍या रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. हैदर ऊर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण (वय २०, रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), इरफान इब्राहिम पठाण (वय ३५), युसुफ असिफ पठाण (वय २२), गौसखॉ ईस्माईल पठाण (वय ३४, सर्व रा. कन्नड, जि. औरंगाबाद) आणि अकिलखॉ ईस्माईलखाऊ पठाण (वय २२, रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत. हे पाचही आरोपी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून ५ डिसेबर रोजी पळून गेले होते. त्यातील गौसखॉ पठाण हा सराईत असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सप्टेबर २०२२ मध्ये नवापूर येथे साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यातील चंदनाचे झाडे कापून ते अब्दुल रेहमान कादर (रा. गवाडी, ता. जि. सेंधवा, मध्य प्रदेश) यांना विक्री केल्याचे सांगितले. (Nandurbar Police)

नंदुबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील (Nandurbar SP PR Patil) यांनी नवापूर पोलीस ठाणे (Navapur Police Station) व स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB Nandurbar) एक पथक तयार करुन मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात रवाना केले. या पथकाने सेंधवा गवाडी गावात जाऊन अब्दुल कादर याची माहिती घेतली. तो एस बी अरोमॅट्रीक्स नावाची फॅक्टरी चालवत असल्याचे समजले. पोलीस पथक या फॅक्टरीत गेले असता तेथे तिघे जण होते. पोलिसांनी अब्दुल रहेमान अब्दुल कादर (वय ५८, मुळ रा. कुन्नीकलम, केरळ), सौदागर सहदेव कोलते (वय ४६) आणि उमेश विलास सूर्यवंशी (वय ४०, दोघे रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

पथकाने संपूर्ण फॅक्टरीची पाहणी केली असता एका टाटा कंपनीच्या योद्धा ट्रकमध्ये खालच्या बाजूला दोन तीन फुटाचे लांब खाच व २९२ किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे मिळून आले. फॅक्टरीची बारकाईने पाहणी केल्यावर तेथे १७ लाख ७२ हजार रुपयांचे २६ किलो वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकुड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक आढळून आला. अब्दुल कादर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याला गौसखॉ पठाण याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून चंदनाचे झाडाचे तुकडे चोरी करुन आणल्याचे सांगितले. त्यामुळे या तीनही राज्यातील आणखी काही चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक पी़ आऱ पाटील यांनी सांगितले की, या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून
गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन गुन्ह्यात सहभाग असणार्‍यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर
कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून या तीनही राज्यातील चंदन चोरीचे
बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (SDPO Sachin Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI KIrankumar Khedkar) ,
नवापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे (Dnyaneshwar Ware), पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ,
हवालदार दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश बच्छे,
परमानंद काळे, दिनेश बाविस्कर तसेच जितेंद्र अहिरराव, अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar Police Raid Sandalwood Factories in Madhya Pradesh; Sandalwood oil and wood worth 15 lakhs seized, police reached the root of sandalwood smuggling for the first time in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Former MLA Mohan Joshi | पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? – मोहन जोशी

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती