Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या 1207 महिला व 263 अल्पवयीन मुलींचा शोध ! राज्य महिला आयोगाकडून पोलिसांचं कौतुक

नंदुरबर : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांनी सन 2018 ते सन 2022 दरम्यान बेपत्ता झालेल्या 1207 महिला आणि 263 अल्पवयीन मुलींचा 23 महिन्यात शोध लावला आहे. बेपत्ता झालेल्यांना शोधण्याचे हे प्रमाण सरासरी 95 टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून Anti Human Trafficking Unit (AHTU) देखील गेल्या 5 वर्षात शोध न लागलेल्या 13 ते 18 वयोगटातील 14 मुलींचा शोध लावण्यात आला आहे. नंदुरबार पोलिसांच्या या कामगिरीचे राज्य महिला आयोगाकडून (Maharashtra Women’s Commission) कौतुक देखील करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी त्याबाबतचे ट्विट केले आहे. (Nandurbar Police News)

 

 

 

नंदुरबार पोलिसांकडून दरमहा घेण्यात येणार्‍या क्राईम मिटींगमध्ये (Police Crime Meeting) जिल्ह्यातील मालमत्तेविरूघ्दचे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत सन 2018 ते सन 2022 या 5 वर्षाच्या कालावधीत एकुण 1278 महिला बेपत्ता आणि 274 अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून घेवून गेल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या गुन्हयातील पिडीत मुली अद्यापही मिळून आलेल्या नसल्यामुळे अशा गुन्हयांचा गांभीर्याने तपास करून त्यांचा शोध घेण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात यावी असे निर्देश पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सर्वच पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिले होते. (Nandurbar Police News)

नंदुरबार पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Police Control Room) मिसिंग डेस्क (Missing Desk) देखील कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनमधील (Police Stations In Nandurbar District) 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी असे एकुण 12 अधिकारी आणि 24 पोलिस अंमलदारांचे पोलिस पथक पोलिस स्टेशन स्तरावर तयार करण्यात आले होते. त्यांनी सन 2018 ते सन 2022 दरम्यान महाराष्ट्रासह, गुजरात व मध्यप्रदेश राज्यात जावून बेपत्ता झोल्या 1278 महिलांपैकी 1207 आणि 274 अल्पवयीन मुलींनी 263 अल्पवयीन मुलींचा शोध लावला आहे.

 

अपहरणाच्या गुन्हयात शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरिता पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
एएचटीयुने मागील 2 वर्षात सन 2017 पासून शोध न लागलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध लावला आहे.

 

 

दरम्यान, नंदुरबार पोलिसांच्या या कामगिरीचे राज्य महिला आयोगाकडून कौतुक करण्यात आले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

 

Web Title :  Nandurbar Police News | Search of 1207 missing women and 263 minor girls from
Nandurbar police! Appreciation of Police by Maharashtra State Commission for Women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा