Nandurbar Police News | दंडपाणेश्वर मंदिर संस्थेकडून एसपी पी.आर.पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

मंदिरातील चोरीचा 48 तासात छडा आणि मुद्देमाल जप्त केल्यामुळे केला गौरव

नंदुरबार : Nandurbar Police News | मंदिरातील चोरीचा अवघ्या 48 तासांमध्ये छडा लावून चोरटयांना गजाआड केले, तसेच त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल (मौल्यवान वस्तू व रोकड) हस्तगत करण्यात यश आले. त्यामुळे दंडपाणेश्वर मंदिर संस्थेकडून नंदुरबार जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा भव्य सत्कार करण्यात आला. (Nandurbar Police News)

यावेळी शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी व गणेशभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. गेल्या आठवडयात शहरातील प्रसिध्द आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या दंडपाणेश्वर मंदिरातील गणेशमुर्तीचा मुकुट आणि दानपेटयांमधील रोख रक्कम चोरटयांनी लंपास केली होती. तसेच पुढे जाऊन जैन मंदिरातील दानपेटयांमधील रक्कमेवर देखील डल्ला मारला होता. मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे जिल्हयातील भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. घडलेल्या गंभीर घटनेमुळे गणेशभक्त देखील नाराज होते. पोलिसांनी देखील इतर मालमत्तेच्या चोरीच्या घटनेपेक्षा मंदिरातील चोरीबाबत चिंता व्यक्त केली होती. (Nandurbar Police News)

गेल्या महिन्यात शहाद्यातील जैन मंदिरानंतर नंदुरबार शहरातील या दोन मंदिरातील ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारत धार्मिक स्थळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, चोरटयांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरून नेला होता. चोरटयांनी एकही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे त्यांचा माग काढून शोध घेणे आणि त्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर उभे राहिले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत चोरीच्या गुन्हयाचा पर्दाफाश करून चोरटयांच्या मुसक्या आवळा असा आदेश देत महत्वाच्या सुचना तपास अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या. एसपी पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक नीलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर (PI Kirankumar Khedkar), शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर (PI Ravindra Kalamkar) यांनी आणि त्यांच्या पथकाने चोरीच्या गुन्हयाचा तपास युध्दपातळीवर सुरू केला.

तपासास सुरूवात झाल्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये पोलिस पथकाने आंतरराज्यीय घरफोडया करणार्‍यांचा पर्दाफाश केला.
त्यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. चोरटयांकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.
पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अत्यंत कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून चोरटयांना जेरबंद केले
आणि मुद्देमाल हस्तगत केला. त्यामुळे दंडपाणेश्वर मंदिर संस्थेने पोलिसांचा या तपासाबद्दल आणि पोलिसांचे
मनोबल वाढविण्यासाठी पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील आणि इतर अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ
आयोजित केला. त्यामध्ये पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना
गोरविण्यात आले. यावेळी दंडपाणेश्वर मंदिराचे अध्यक्ष किशोरभाई वाणी, अ‍ॅड. प्रशांत चौधरी,
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, इतर मान्यवरांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title :- Nandurbar Police News | SP PR Patil and other Police officers and employees are felicitated from Dandapaneshwar temple organization Nandurbar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलला २८ लाखांना गंडा घालणार्‍या मॅनेजरला अटक

Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार