Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांतल्या माणुसकीची पुन्हा प्रचिती ! दिव्यांगाच्या पायांना दिले बळ

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसांबद्दलच सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलीसांनी (Nandurbar Police) मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे. नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) एका दिव्यांग मुलाला मदतीचा हात दिला आहे. दिव्यांग मुलाला त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाता यावे यासाठी पोलिसांनी त्याला तिनचाकी गाडी घेण्यासाठी 63 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. श्रेयस दिलीप नांदेडकर Shreyas Dilip Nandedkar (वय 35) असे दिव्यांग मुलाचे नाव आहे.

श्रेयस हा जन्मतःच संपूर्ण दिव्यांग ! हात व पाय ठार लुळे असून नसल्यासारखेच. उभा रहाता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यांनेच उचलून न्यावे लागते. बोलतांना अडखळत बोलतो. परिस्थिती अत्यंत गरीब. नंदुरबार पोलीसांच्या (Nandurbar Police) भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर (Dilip Nandedkar) झेरॅाक्स मशीनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. श्रेयसच्या एका हाताची थोडीशी हालचाल होते, परिस्थितीला शरण न जाता याच एका हाताने तो वडिलांना झेरॅाक्स काढायला मदत करायचा.

अचानक 14 एप्रिलला श्रेयसचे वडिलांचे हार्ट ॲटॅकने (Heart Attack) निधन झाले आणि दिव्यांग श्रेयसच्या कुटुंबावर नियतीने दुसरा निर्दयी आघात केला. स्वतःलाच उभे रहाता येत नाही तेथे या वयात आईचा सांभाळ कसा करायचा या विचारांने तो सैरभैर झाला. आतापर्यंत वडील त्याला दुकानापर्यंत पाठीवर उचलून आणायचे, आता पुढे काय? जीवनाशी लढायचे तर आहेच पण कसे? दिलीप नांदेडकरांचा संसार त्यांच्या पश्चात उघड्यावर पडला.

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police PR Patil) यांनी श्रेयसला बालावून घेतले. आईसह तो कार्यालयात आला. पुढे काय ? विचारले तर तो म्हणाला “काही नाही..लढणार!” पोलीस अधीक्षक यांच्या एका हाकेसरशी नंदुरबार पोलीसांची टीम कामाला लागली. पुन्हा एक मोडू पाहणारा संसार उभा करायचा असा विचार पुढे आला. पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar), पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar) व त्यांच्या सहकाऱ्यानी निधी जमा केला. तब्बल 63 हजार रुपये जमा झाले. या रकमेचा चेक थरथरत्या हातांनी स्विकारत श्रेयसने नंदुरबार पोलीसांचे आभार मानले.

या रक्कमेतून आता श्रेयस स्वताच्या तिनचाकी बाईकवर झेरॅाक्सच्या दुकानात जाऊ शकेल. जन्मताच दुर्बल असलेल्या श्रेयसच्या पायात नंदुरबार पोलीसांनी बळ ओतले. एका दिव्यांगास नियतीने लाथाडले पण पोलीसांनी आपलेसे केले. मागेही एका गरीब वृद्धास मदतीचा हात देऊन नंदुरबार पोलींसानी समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयातून घरी जाताना श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते. जाता जाता तो पोलिसांना आपल्या अडखळत्या शब्दात कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती नक्कीच म्हणाला असेल..

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा!
पाठीवरती हात ठेवून…फक्त लढ म्हणा!!”

Web Title : Nandurbar Police | Re-realization of humanity in Nandurbar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी