×
Homeक्राईम स्टोरीNandurbar Police | मद्यापान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईसह परवाना रद्द, नंदुरबार...

Nandurbar Police | मद्यापान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईसह परवाना रद्द, नंदुरबार पोलिसांची विशेष मोहीम

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र (Deputy Inspector General of Police, Nashik Range) यांच्या आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या (Drunk Driving) चालकांविरुद्ध विशेष मोहीम (Special Campaign) राबवण्यात येत आहे. रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडलेल्यांची संख्या वाढत असल्याने नंदुरबार पोलिसांकडून (Nandurbar Police) ही मोहीम राबवण्यात येत आहे. या महिमेंतर्गत दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात येत आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar Police) सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली जात असताना काही चालक मद्यपान केल्याचे आढळून आले. मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यातील 8 चालकांचे लायसन्स यापूर्वी 3 महिने व 6 महिन्यासाठी तर 52 वाहन चालकांचे लायसन्स 6 महिन्यांसाठी निलंबित (License Suspend) करण्यात आले होते.

 

सोमवारी (दि.14) सहा वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांचे लायसन्स 1 वर्षासाठी तर 14 जणांचे 6 महिन्यासाठी असे एकूण 22 वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये उपनगर 5, विसरवाडी 4, नवापुर 3, शहादा 3, नंदुरबार तालुका 2, तळोदा 2, सारंगखेडा 1, नंदुरबार शहर 1, अक्कलकुवा 1 असे 22 वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर 27 जणांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Deputy Regional Transport Officer) RTO यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई भविष्यात देखील करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालवणे केवळ तुच्यासाठीच नाही तर इतरांच्या देखील जिवितास धोकादायक आहे.
नागरिकांनी स्वत:चे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच मद्यपान करुन वाहन चालवू नये.
दारु पिऊन वाहन चालविताना कोणी दुचाकीस्वार व चार चाकी चालक आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करुन
त्यांचे लायसन्स निलंबित करण्याची कारवाई ही भविष्यात अशीच सुरु राहणार असल्याचे
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांनी सांगितले.

 

Web Title :- Nandurbar Police | Special operation of Nandurbar police, revocation of license with action against drunk drivers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून लुटणारे दोन परप्रांतीय नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात, लुटलेली 1 लाखांची रक्कम जप्त

 

Shivsena Leader Sudhir Joshi | नगरसवेक ते मंत्रिपदापर्यंतचा सुधीर जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास, वाचा एका क्लिकवर

 

Nandurbar Police | चोरीला गेलेली एक लाखाची रक्कम परत मिळवून देणाऱ्या नंदुरबार पोलिसांचा ‘सत्कार’ आणि ‘आभार’

Must Read
Related News