Nandurbar Police | नंदुरबार पोलीस अधीक्षकांच्या निजी कक्षाचे IG डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police | कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखताना पोलिसांना आराम करता यावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या (SP Office) आवारातील मोकळ्या जागेत निजी कक्ष (Rest Room) उभारण्यात आला आहे. या निजी कक्षाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस  महारिनिक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील (Special Inspector General of Police of Nashik Range B.G. Shekhar Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. बी.जी. शेखर पाटील हे नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) दलाच्या जिल्हा वार्षिक तपासणी (Annual Inspection) निरीक्षणासाठी आले होते.

 

 

कायदा व सुव्यवस्था राखताना काही वेळा पोलिसांना (Nandurbar Police) घरी जाता येत नाही. अशा वेळेस पोलिसांना थोडा आराम करता यावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मागील जागेत एका लहान खोलीत निजी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पी.आर पाटील (Superintendent of Police PR Patil) यांनी पोलीस मुख्यालय (Police Headquarters), पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस वसाहतीचे (Police Colony) अद्यावतीकरण सुरु केले आहे.

 

या कार्यक्रमाला पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील,
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार(Addl SP Vijay Pawar),
पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वाळवी (DySP vishwas valvi), पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान (DySP Atmaram Pradhan),
उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray),
उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे (Sub Divisional Police Officer Shahada Srikant Ghumre),
पोलीस उप विभागीय अधिकारी अक्कलकुवा संभाजी सावंत (Sub Divisional Police Officer Akkalkuwa Sambhaji Sawant)
यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title :- Nandurbar Police | Superintendent’s Rest Room Inauguration by IG Dr. B.G. Shekhar Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Naryan Rane | नवाब मलिक देशद्रोही व्यक्ती, नारायण राणे यांची घणाघाती टीका

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

 

Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!