Nandurbar SP PR Patil | अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना घरपोच रेशन ! नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचा माणुसकीचा चेहरा आला समोर

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar SP PR Patil | पोलिसांना कर्तव्य करताना वेळ काळाचे बंधन नसते. दिवसंदिवस बंदोबस्त, खाण्याची अबाळ, वेळप्रसंगी तेलकट उघड्यावरचे पदार्थ खाण्याची येत असलेली वेळ, मानसिक, शारीरीक ताण पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर असतो. अनेकदा देशात, राज्यात कोठेतरी काहीतरी घडते. त्याचा परिणाम आपल्या शहरातील कायदा सुव्यवस्थेवर होऊ नये, यासाठी पोलिसांचा दिवसरात्र बंदोबस्त लागतो. त्यातून त्यांना साप्ताहिक सुट्टीही मिळू शकत नाही. त्यामुळेच वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांमध्ये आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसतात. त्याचबरोबर अनेकदा नियमित सुट्टी मिळत नसल्याने अनेक पोलीस कर्मचारी आजारी असल्याचे दाखवून सीक रिपोर्ट करतात आणि सुट्टी घेतात. इतर कोणत्याही खात्यापेक्षा पोलीस खात्यात रीक रिपोर्ट करण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा हे रिपोर्ट खोटेही असतात. मात्र, सुट्टी मिळत नसल्याने पोलिसांचा असा रिपोर्ट करण्याशिवाय इलाज नसतो. (Nandurbar SP PR Patil)

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (SP PR Patil) यांनी कर्तव्याबरोबर पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्यावर नेहमीच भर दिला आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला.

नंदूरबार जिल्हा पोलीस दलातील गुन्हे बैठकीत पोलिसांच्या आजारपणाविषयीचा विषय आला होता. अनेक पोलीस आजारी असल्याचे तसेच काही पोलीस कर्मचारी अनेक दिवस गंभीर आजार, दुर्दर रोगामुळे घरी असल्याचे आढळून आले. अनेक पोलीस कर्मचारी अर्धांग वायू, अपघात व अन्य कारणामुळे आजारी असल्याचे दिसून आले. (Nandurbar SP PR Patil)

 

या अंथरुणावर खिळून असलेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने महिन्याचा किराणा सामान त्यांच्या घरी पाठविण्याचा आदेश पी आर पाटील यांनी दिला.
पोलीस अधीक्षकांचा आदेश म्हटल्यावर त्याची तातडीने अंमलबजावणी झाली आणि अशा आजारी कर्मचार्‍यांच्या घरी रेशन पाठविण्यात आले.
घरी आलेले रेशन आणि पोलीस अधीक्षकांकडून प्रकृतीविषयी केली गेलेली विचारपूस यामुळे कर्मचारी भारावून गेले.

 

Web Title :- Nandurbar SP PR Patil | Home delivery rations to bedridden police personnel! Nandurbar District Superintendent of Police PR Patil’s face of humanity came to the fore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’