US OPEN : पहिला सेट गमावल्यानंतर 26 वर्षात फायनल जिंकणारी पहिली खेळाडू बनली ओसाका

नवी दिल्ली : जपानची नाओमी ओसाका यूएस ओपन 2020 ची विजेती बनली आहे. तिने फायनलमध्ये बेलारूसच्या विक्टोरिया आजारेंकावर 1-6, 6-3, 6-3 ने मात केली. या 22 वर्षीय खेळाडूचा हा दुसरा यूएस ओपन कप आहे. अजारेंकाला तिसर्‍यांदा यूएस ओपन फायनलमध्ये अपयश आले आहे. यापूर्वी ती 2012 आणि 2013 मध्ये सेरेना विलियम्सकडून पराभूत झाली होती.

वर्ल्ड नंबर-9 जपानी नाओमी ओसाकाने पहला सेट सहजपणे 1-6 ने गमावला, परंतु पुन्हा जबरदस्त पुरागमन करत तिने पुढील दोन सेट आपल्या नावावर करत स्पर्धा जिंकली, ती 26 वर्षात पहिला सेट गमावल्यानंतर फायनल जिंकणारी पहिली खेळाडू बनली आहे, तिच्या अगोदर 1994 मध्ये स्पेनची अरांत्जा सांचेज विकारियोने स्टेफी ग्राफकडून पहिला सेट गमावल्यानंतर कप जिंकला होता.