CBI कडून तृणमूल काँग्रेसच्या 2 मंत्र्यांसह एका आमदाराला अटक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी CBI कार्यालयात दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल राज्यात सत्ताधारी असलेला तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा नारद घोटाळा प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने चौकशी सुरु केली आहे. या घोटाळ्यांमधील आरोपी असलेले कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम आणि सुव्रत मुखर्जी, टीएमसीचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरावर CBI छापा टाकला आहे. तसेच या चौघांनाही CBI कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या चौघांनाही CBI कडून अटक करण्यात आलीय.

अटकेवरून ममता बॅनर्जी काय म्हणाल्या ?
CBI ने अटक केलेल्या चारही आरोपीना (नेते) कोर्टासमोर हजार करण्यात येणार आहे. CBI चे एक पथक न्यायालयात उपस्थित असल्याची माहिती समजते आहे. यावरून आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा वकिलासहित CBI कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तर टीएमसी काँग्रेस मंत्री, आमदारांच्या अटकेचा विरोध करत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, राज्य सरकार अथवा कोर्टाच्या नोटिशीशिवाय या चोघांना अटक केली जाऊ शकत नाही. या नेत्यांना अटक केली तर मलाही अटक करा, असे ममता यांनी CBI कार्यालयात म्हटल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक –
या प्रकरणावरून बंगालचे विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अशा पद्धतीने मंत्र्यांची आणि आमदारांची अटक असंवैधानिक आहे. हाय कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही आमदाराला अटक करण्याआधी अध्यक्षांची (सभापती) परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, माझ्याकडून अशा प्रकारची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असे सभापती बिमान बॅनर्जी म्हणाले आहेत. तसेच टीएमसीचे खा. विधिज्ञ कल्याण बॅनर्जी हे सुद्धा CBI कार्यालयात दाखल झालेत. कायदेशीररित्या या प्रसंगाला आम्ही सामोरं जाऊ, असे त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी दिली होती परवानगी –
CBI ने बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून नारदा स्टिंग प्रकरणात फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी घेतली होती. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तात्काळ राज्यपालांनी CBI ला खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती.

‘या’ भाजप नेत्यांचंही नाव –
दरम्यान, या प्रकरणामध्ये भाजपचे काही नेते आहेत, की, जे टीएमसीमधून भाजप पक्षात प्रवेश केलेलं आहेत. ते म्हणजे सोवन चॅटर्जी यांनी आता दोन्ही पक्षांशी आपले संबंध तोडलेत. तर दुसरे म्हणजे ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी आणि मुकूल रॉय यांचे देखील नाव या घोटाळ्यात समोर आलं होतं. भाजपने २०१६ साली आपल्या यूट्यूब चॅनलवर याबाबत अपलोड केलेला व्हिडिओ हे दोन्ही नेते टीएमसीमधून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र डीलिट केल्याची जोरदार चर्चा झाली होती.

काय आहे नारदा घोटाळा?
पश्चिम बंगालमध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीआधी नारदा स्टिंग टेप जाहीर करण्यात आले होते. हे टेप २०१४ साली रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा केला होता. कथित रुपात यामध्ये टीएमसीचे मंत्री, खासदार आणि आमदार एका काल्पनिक कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेत असताना दिसत असल्याचा आरोप केला गेला होता. नारदा स्टिंग प्रकरण समोर आलं तेव्हा आरोपी मंत्रीपदावर होते. हे स्टिंग ऑपरेशन कथितरित्या नारदा न्यूज वेबसाईटच्या मॅथ्यु सॅम्युअल यांच्याकडू करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. कोलकाता हाय कोर्टाने २०१७ च्या मार्च महिन्यात स्टिंग ऑपरेशनच्या CBI चौकशीचे आदेश दिले गेले होते.