Narayan Rane | ’मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’ – नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | हे महाविकास आघाडी सरकार पडेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणत आहेत. मात्र सरकार पडताना दिसत नाही. यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पत्रकारांनी विचारला. राणे म्हणाले, चंद्रकात पाटील यांनी हे सरकार केव्हा पडेल अशी वेळ कधीही दिलेली नाही, की हे सरकार एक महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल. पडेल, पडेल. आज ना उद्या पडेल.

सरकार कोणत्याही क्षणी पडेल
तुम्हाला काय वाटते असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, तेच तर मी सांगितले. जे चंद्रकांत पाटील यांना वाटत आहे तसेच मलाही वाटत आहे. मी वेळ कुठे दिला, महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल. हे सरकार कोणत्याही क्षणी पडेल, असे राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसात तुम्हाला कळेल’, असे म्हटल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने ही चर्चा अधिकच रंगली आहे. आता राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली.

 

संजय राऊत काय बोलतात त्याला अर्थ नाही – राणे

यावेळी राणे विचारण्यात आले की,
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणतात की,
महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षे टिकणार आहे.
यावर राणे यांनी राऊत यांचा ऐकरी उल्लेख करत म्हटले की,
संजय राऊत यांना जे काही वाटते त्याला मी का उत्तर द्यावे.

संजय राऊत कोण आहेत? ते माझे बॉस आहेत का? मी का उत्तर देऊ त्यांच्या प्रश्नांना? पाच वर्षे नाही,
दहा वर्षे राहा म्हणावे. एकदा तर ते 25 वर्षे सरकार टिकेल असे बोलले होते.
ते काय घेऊन बोलतात, पाणी घेऊन बोलतात की अजून काही माहीत नाही.
संजय राऊत जे बोलतात त्याला काही अर्थ नाही.

Web Titel :- Narayan Rane | aghadi govt will fall any time but i will not give any time period says union minister narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेत 1.20 कोटी रूपये किंमतीचे 3 किलो सोन्याचे दागिने भरदिवसा लांबविले, लहान मुलासह 2 महिलांचा प्रताप, जाणून घ्या प्रकरण

BSP MP Satish Chandra Mishra | सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा – यूपीत प्रत्येक 10 पैकी 8 एन्काऊंटर ब्राह्मणांचे होत आहेत

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू, 3,841 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी