Narayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळोवेळी टीका करणार्‍या नारायण राणेंना पीएम मोदींकडून मिळणार ‘गिफ्ट’?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेणार आहेत. काही दिवसापासून विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि शिवसेनेवर (shivsena) शरसंधान साधत असल्याने मोदी सरकारकडून राणेंना स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राणेंच्या या दिल्ली दौऱ्याला (Delhi tour) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकस आघाडी सरकार यांच्यात टोलवाटोलवी सुरु आहे.
दुसरीकडे ठाकरे सरकारवर खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) सातत्यानं शाब्दिक प्रहार करत आहेत.
त्यातच पुढील वर्षी मुंबई महानगर पालिकेची (Mumbai Municipal Corporation) निवडणूक होत आहे.
त्यामुळे भाजपने आतापासूनच महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.
जर राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

Mega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आले होते.
त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं.
या दौऱ्यात शहा यांनी राणेंच्या कामाचे तोंड भरून कौतुक केलं होत.
त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे.
राणेंचा आक्रमकपणा आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर सतत केलेले शाब्दिक हल्ले यांमुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे.
अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे केंद्राच्या अनेक खात्याचा अतिरिक्त प्रभार आहे.
त्यामुळे लवकरच नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
महत्त्वाचे म्हणजे शिवसेना, शिरोमणी अकाली दलानं साथ सोडल्यानं त्यांच्या वाट्याची दोन मंत्रिपदंही रिक्त आहेत.

Web Title : Narayan Rane and Shiv Sena | Will Narayan Rane, who criticizes Shiv Sena from time to time, get ‘gift’ from PM Modi?

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज