Narayan Rane | नारायण राणेंचा सेनेवर निशाणा, म्हणाले – ‘पैसा खाणे शिवसेनेचा धर्म, शिवसैनिकांना दमडी तरी मिळाली का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध चांगलंच रंगलं असल्याचे दिसत आहे. यातच शिवसेना आणि राणे (Shivsena And Rane) यांच्यात देखील मोठा वादंग झाल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. दरम्यान आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावेळी राणे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, ”शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या (Shiv Sena leader Yashwant Jadhav) डायरीत कुणाकुणाची नावे आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी जे पैसे खाल्ले ते मुंबईच्या जनतेने जो कर भरला आहे. त्यातून 15 टक्के कंत्राटातून काढले ते आहेत. मुंबईकरांच्या मेहनतीचा पैसा यशवंत जाधवांनी खाल्ला. यावर कुणीच बोलत नाही. पक्षप्रमुख पण नाही आणि शिवसेनाही नाही. बेकायदेशीरपणे केलेल्या कामाचं समर्थन शिवसेना कसं करते हे लोकं पाहत आहेत. पैसा खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

 

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, ”ईडीची धाड पडली तर तो पैसा कुठून आला त्याची माहिती दे. अधिकाऱ्यांकडे खुलासा कर. वकील घेऊन जा, पण सूडाची कारवाई वैगेरे बोलत बसलात. पीएमएलए कायदा त्यासाठीच आहे. शिवसेना कुणाला घाबरणार नाही. तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? एका जाधवांकडे इतका कोट्यवधीचा पैसा मिळाला तर बाकींच्याकडे किती असतील? महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नावं CBI कडे देणार आहे,” असं राणे म्हणाले.

दरम्यान, ”कोरोनाकाळात अनेक शिवसैनिक गेले. त्यांचे घर संसार उघड्यावर पडले. मुख्यमंत्री एकाच्या तरी घरी गेले का? रमेश मोरेला (Ramesh More) कोणी मारलं? पोलीस कर्तबगार आहे. तुमच्याकडे सरकार आहे. चौकशी करा. शिवसेना वाढण्यासाठी दिवस रात्र घालवली त्यांच्यासाठी पक्षाने काय केले. लोकप्रभामध्ये असताना ठाकरे कुटुंबावर कपडे उतरवण्याची भाषा संजय राऊतांनीच (Sanjay Raut) केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे की संजय राऊत? हा लोकांना प्रश्न पडला आहे, असा टोला राणेंनी लगावला.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane attack on shivsena and cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

 

Insulin Plant For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांना इन्सुलिन देते ही वनस्पती, केवळ 1 पान चावल्याने कंट्रोल होईल Blood Sugar

 

Sharad Pawar | ‘शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना सोडणार नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा